Warkari : कर्जत शहरात रंगला बाल वारकऱ्यांचा भक्तीचा मेळा

Warkari : कर्जत शहरात रंगला बाल वारकऱ्यांचा भक्तीचा मेळा

0
Warkari : कर्जत शहरात रंगला बाल वारकऱ्यांचा भक्तीचा मेळा
Warkari : कर्जत शहरात रंगला बाल वारकऱ्यांचा भक्तीचा मेळा

Warkari : कर्जत : कर्जत शहरातील शैक्षणिक संस्थांमध्ये आषाढी एकादशीनिम्मित (Ashadhi Ekadashi) बालदिंडीने ज्ञानोबा-माऊली- तुकाराम आणि हरिनामाच्या गजराने शहराचा परिसर दणाणून सोडला. या दिंडीत (Dindi) बाल विद्यार्थी पांडुरंग, रुक्मिणी आणि विविध संतांच्या वेशभूषेत लक्ष वेधत होते. बाल वारकऱ्यांच्या (Warkari) हातात भगव्या पताका, टाळ, मृदुंग, वीणा तर विद्यार्थिनीच्या डोक्यावर तुळस आणि पालखीमध्ये विटेवरी उभा असणारी विठ्ठल-रुक्मिणीची मूर्तीने बालदिंडी शहरात मार्गक्रमण करत होती. ग्रामदैवत संत सदगुरु गोदड महाराज मंदिरात आरती करीत दिंडी शाळेकडे रवाना झाली.

Warkari : कर्जत शहरात रंगला बाल वारकऱ्यांचा भक्तीचा मेळा
Warkari : कर्जत शहरात रंगला बाल वारकऱ्यांचा भक्तीचा मेळा

नक्की वाचा: मोहरम सणानिमित्त हे रस्ते राहणार ‘नो व्हेईकल झोन

संतांची वेशभूषा साकारत आषाढी वारीत सहभाग

शहरातील श्री श्री रविशंकर विद्यामंदिर, न्यू गुरुकुल इंग्लिश स्कुल, डायनॅमिक इंग्लिश स्कुलने आषाढी एकादशीनिम्मित बालदिंड्याचे आयोजन केले होते. यात शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेत हरिनामाचा गजर केला. यावेळी सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी यासह विविध संतांची वेशभूषा साकार करीत आषाढी वारीत सहभाग नोंदविला.

Warkari : कर्जत शहरात रंगला बाल वारकऱ्यांचा भक्तीचा मेळा
Warkari : कर्जत शहरात रंगला बाल वारकऱ्यांचा भक्तीचा मेळा

अवश्य वाचा: आषाढीसाठी पंढरपूर प्रशासन अलर्ट मोडवर;चंद्रभागेच्या तिरी वारकऱ्यांची गर्दी

ठिकठिकाणी ज्ञानोबा-माऊली- तुकारामाच्या गजर (Warkari)

बाल विद्यार्थी वारकरी हातात भगव्या पताका, टाळ, मृदुंग, वीणाच्या निनादात भक्ती रसात रंगले होते. त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. दादा पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणातून बालदिंडीस सुरुवात होत संपूर्ण शहरात मार्गक्रमण करीत ठिकठिकाणी ज्ञानोबा-माऊली- तुकारामाच्या गजरात शहरवासीयांचे लक्ष वेधत होते. ग्रामदैवत संत सदगुरु गोदड महाराज यांच्या मंदिरात बालदिंडी पोहचली असता विद्यार्थ्यांनी हरिनामाचा गजर करीत परिसर दणाणून सोडला. या ठिकाणी आरती होत दिंडी पुन्हा शाळेकडे रवाना झाली. शहरातून दिंडी मार्गाक्रमन करताना शाळेचे शिक्षक आणि वाहतूक पोलिसांनी रहदारीचे नियोजन पार पाडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here