Warning : श्रीरामपूरमध्ये रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

Warning : श्रीरामपूरमध्ये रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

0
Warning

Warning : श्रीरामपूर : राज्य शासनाने (State Govt) दोन दिवसात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मागण्या मान्य करून मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा निर्णय लावावा. त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेली सगेसोयरे बाबतची अधिसूचना मंजूर करून कायदा संमत करण्यासाठी विधिमंडळाचे अधिवेशन तातडीने बोलवावे. अन्यथा श्रीरामपूर बंद केले जाईल, असा इशारा (Warning) सकल मराठा समाज, श्रीरामपूरच्या वतीने देण्यात आला आहे. दरम्यान श्रीरामपूर मर्चंट असोसिएशननेही या मागणीला पाठिंबा दिला आहे.

Maratha Reservation
Maratha Reservation

हे देखील वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाराष्ट्रात एकही सभा होऊ देणार नाही; मराठे काय आहे हे १५ तारखेनंतर पाहा, मनोज जरांगेंचा इशारा

व्यापारी व सकल मराठा समाजाने एकत्रितपणे निवेदन (Warning)


 श्रीरामपूर शहरातील छोटे- मोठे व्यावसायिक व इतरांचे आर्थिक नुकसान होऊ नये, याकरिता श्रीरामपूर बंद न ठेवता मर्चंट असोसिएशन, व्यापारी बांधव व सकल मराठा समाजाने प्रांताधिकारी, तहसीलदार आणि पोलीस अधिकारी यांना एकत्रितपणे निवेदन दिले. याप्रसंगी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी निवेदन स्वीकारले आणि आपल्या भावना व मागण्या राज्य शासनापर्यंत पाठवण्यात येईल असे सांगितले. यावेळी मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम उर्फ मुन्ना झंवर यांनी व्यापाऱ्यांच्यावतीने पाठिंबा जाहीर केला. तर सकल मराठा समाजाचे नागेश सावंत, सुरेश कांगुणे, केतन खोरे, श्रीकृष्ण बडाख यांची भाषणे झाली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण आणि जरांगे पाटील यांचे उपोषणाचा प्रश्न मिटला नाही तर श्रीरामपुरातही आमरण उपोषण, साखळी उपोषण, श्रीरामपूर बंद, रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा दिला. त्याचबरोबर बेलापूर, रामगड येथील अनुभाई सय्यद व बेलापूर ग्रामपंचायतच्या माजी सदस्या करीमाबी सय्यद यांनी मुस्लिम समाजातर्फे उपस्थित राहून पाठिंबा दिला.

नक्की वाचा: मराठा क्रांती मोर्चाकडून राज्यात बंदची हाक

यांची उपस्थिती (Warning)


यावेळी प्रांताधिकारी कार्यालय येथे श्रीरामपूर मर्चंट असोसिएशनचे उपाध्यक्ष बाळासाहेब खाबिया, प्रवीण गुलाटी, गौतम उपाध्ये, संजय कासलीवाल, धर्मेश शाह, प्रेमचंद कुंकूलोळ, अनिल लुल्ला, राहुल कोठारी, निलेश बोरावके, दत्तात्रय धालपे तसेच सकल मराठा समाजाचे ॲड. बाळासाहेब आगे, किरण गायधने, सुधीर तावडे, राजेंद्र मोरगे,अमोल बोंबले, शरद मामा नवले, राजेंद्र भोसले, प्रसाद खरात, बाळासाहेब मेटे, दत्ता जाधव, धनंजय खंडागळे, संजय सोनवणे, उत्तमराव डांगे, संदीप आसने, संदीप गायकवाड, रंगनाथ माने, मनोज होंडे, बी.जी. गायधने, लक्ष्मीकांत शिंदे, अमोल जैत, बाळासाहेब भोसले, चंद्रकांत काळे, दत्तात्रय पठारे, रमेश नवले, रावसाहेब तोडमल, तुषार पवार, शशिकांत शिंदे, ऋषिकेश मोरगे आदी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here