
Warning : नगर : भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार रविवार (ता. २६) या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यात वीजांचा कडकडाट (Lightning Strike), जोरदार वारे व मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा (Warning) दिला आहे.
नक्की वाचा : महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेतील एक हरकत अंशतः मान्य; आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांची माहिती
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सूचनांचे पालन करावे (Warning)
पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढला असून त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.


