काेड रेड
Warning : नगर : नगर जिल्ह्यात हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस (Stormy Rain) पडण्याची शक्यता आहे, असा इशारा (Warning) भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) दिला आहे. त्यामुळे विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, आपत्तीच्या सूचनांचे काटेकाेर पालन करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management) प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले.
नक्की वाचा: शेवगावमधील शेअर मार्केट फसवणूक प्रकरणातील दोघे वृंदावनमधून जेरबंद
शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार १७ ते २० ऑगस्टपर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस हाेणार आहे. या कालावधीत शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. वादळी वारा, मेघगर्जनेसह विजा पडणे व जाेरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
अवश्य वाचा: ‘मविआ’चा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा; उद्धव ठाकरे
प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे (Warning)
विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. धाेकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये, मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलिस ठाण्याशी अथवा दूरध्वनी क्र. १०७७ (टोल फ्री) वर संपर्क साधावा.