Warning : शेवगाव : वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) वतीने आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) यांच्या शेवगाव संपर्क कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा वंचित बहुजन आघाडीचे राज्य सचिव प्रा. किसन चव्हाण (Prof. Kisan Chavan) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. वंचित बहुजन आघाडी व अधिकाऱ्यांची बैठक तहसीलदारांनी आयोजित केली नाही तर आमदार मोनिका राजळे यांच्या कासार पिंपळगाव येथील निवासस्थानी चटणी भाकर खाऊन काळी दिवाळी साजरी करू, असे यावेळी प्रा. किसन चव्हाण यांनी सांगितले.
नक्की वाचा: मुस्लिम भारताला युद्ध भूमी मानतात,त्यांना देशात ठेवूच नये असे स्वत:आंबेडकर म्हणालेत – गोपीचंद पडळकर
आमदार राजळे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
आज सकाळी साडेअकरा वाजता शेवगाव शहरातील आंबेडकर चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. तर मोर्चा दुपारी दोन वाजता संपला. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजप सरकार तसेच आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचा मुद्दा प्रभावीपणे मांडला. शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, साखर कारखाना सुरू होण्यापूर्वी ऊसाचा दर निश्चित करावा, कापसाला हमीभाव मिळावा, पोट खराब्याच्या दुरुस्त करून नोंदी लावण्यात याव्यात, भूमि अभिलेख कार्यालयातील भ्रष्टाचार थांबवावा, अशा प्रमुख मागण्या या आंदोलनाद्वारे करण्यात आल्या.
अवश्य वाचा: “लाडक्या बहिणींना केवायसी करावीच लागेल”- अजित पवार
मोठ्या संख्येने कार्यकर्ते, शेतकरी व महिलांचा सहभाग (Warning)
जर वंचित बहुजन आघाडी व अधिकाऱ्यांची बैठक तहसीलदारांनी या संदर्भात आयोजित केली नाही तर आमदार मोनिका राजळे यांच्या कासार पिंपळगाव येथील निवासस्थानी चटणी भाकर खाऊन काळी दिवाळी साजरी करू असे यावेळी प्रा. किसन चव्हाण यांनी सांगितले. मोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्ते, शेतकरी व महिलांचा सहभाग होता.
प्रा. किसन चव्हाण यांनी सांगितले की, (Warning)
“शेतकरी वर्गाच्या प्रश्नांकडे सरकारने सातत्याने दुर्लक्ष केले असून, त्यांच्या हक्कांसाठी आता रस्त्यावर उतरावे लागत आहे. यावेळी शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेलाल शेख, युवा अध्यक्ष ऑगस्टीन गजभिव, कल्याण भागवत, शाहूराव खंडागळे ,पप्पू बोर्डे, सागर गरुड, रवींद्र नीळ, रमेश खरात, रुबीना शेख, रोहिणीताई ठोंबे, अरुण खर्चन, लक्ष्मण मोरे,अरुण झांबरे, दिगंबर बल्लाळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मोर्चाला सामोरे जाताना शेवगावचे तहसीलदार आकाश दहाडदे यांनी दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करून शेतकऱ्यांना देण्यात येतील असे सांगितले. यावेळी शेवगाव पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे मध्यस्थीने परिस्थिती नियंत्रणात ठेवली.