Weather Update: महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा,हवामान खात्याकडून अलर्ट जारी

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी म्हणजेच मॉन्सूनने (Monsoon) मंगळवारी (ता.२) संपूर्ण देशात हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळाले. यंदा केरळमध्ये (Keral) वेळेआधी दाखल झालेल्या मॉन्सूनने तब्बल सहा दिवस अगोदर देश व्यापला आहे.

0
Weather Update: महाराष्ट्रासह 'या' राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा,हवामान खात्याकडून अलर्ट जारी
Weather Update: महाराष्ट्रासह 'या' राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा,हवामान खात्याकडून अलर्ट जारी

नगर : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी म्हणजेच मॉन्सूनने (Monsoon) मंगळवारी (ता.२) संपूर्ण देशात हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळाले. यंदा केरळमध्ये (Keral) वेळेआधी दाखल झालेल्या मॉन्सूनने तब्बल सहा दिवस अगोदर देश व्यापला आहे. जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा कमी ८९ टक्के पाऊस झाला आहे. यंदा मॉन्सूनची वाटचाल काहीशी वेगवान झाल्याचे दिसून आले.

नक्की वाचा : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे विधानपरिषदेतून पाच दिवसांसाठी निलंबित

महाराष्ट्रातही हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा अंदाज (Weather Update)

१९ मे रोजी अंदमान निकोबार बेटांवर दाखल झालेल्या मॉन्सूनवर ‘रेमल’ चक्रीवादळाचा प्रभाव पडला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रातही हवामान विभागाकडून आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांमध्ये विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे कोकणात मात्र अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

अवश्य वाचा : राज्यात जुलैमध्ये जास्त पावसाच्या सरी;हवामान विभागाचा अंदाज

हवामान खात्याकडून ‘या’ ठिकाणी रेड अलर्ट जारी (Weather Update)

हवामान विभागाने अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, पश्चिम बंगाल, सिक्कीम, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि किनारपट्टीवरील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी आहे. त्याचबरोबर काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय पाच आणि सहा जुलै रोजी अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने या ठिकाणी रेड अलर्ट जारी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here