Weather Update:सावधान!२१ डिसेंबरपासून अवकाळी पावसाची शक्यता

0
Weather Update:सावधान!२१ डिसेंबरपासून अवकाळी पावसाची शक्यता
Weather Update:सावधान!२१ डिसेंबरपासून अवकाळी पावसाची शक्यता

Weather Update : राज्यातील वातावरणात सातत्याने बदल (Climate Change) होत आहे. अनेक भागात कडाक्याची थंडी (Cold Weather) पाहायला मिळत आहेत. तर काही भागात ढगाळ वातावरण होत आहे. दरम्यान,अशातच हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. डख यांनी दिलेल्या माहितीनुसार,राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

नक्की वाचा : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल  

शेतकऱ्यांनी २० तारखेपर्यंत कांदा काढणी करुन घ्यावी…(Weather Update)

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार,राज्यात २१ डिसेंबर ते २५ डिसेंबर पर्यंत भाग बदलत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळं शेतकऱ्यांनी २० तारखेपर्यंत आपल्या शेतीची कामे पूर्ण करुन घ्यावीत,असं आवाहन डख यांनी केलं आहे. ज्या शेतकऱ्यांची कांदा काढणी बाकी असेल त्यांनी २० तारखेपर्यंत कांदा काढणी करुन घ्यावी,असंही आवाहन त्यांनी केलं आहे. २१ ते २६ डिसेंबर दरम्यान मुंबईसह पुणे, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा सहित राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडणार आहे. १९ डिसेंबर पर्यंत राज्यात थंडीची लाट राहणार आहे. २० तारखेनंतर वातावरणात बदल होईल. यानंतर २१ डिसेंबरला अवकाळी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे.

अवश्य वाचा : ‘पाताल लोक’ वेबसीरिजच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा;पोस्टर प्रदर्शित

२६ तारखेपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता (Weather Update)

२१ तारखेला अवकाळी पाऊस सुरू झाला की,२६ तारखेपर्यंत राज्यात अवकाळी पाऊस सुरू राहणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची काळजी घ्यावी. एवढेच नाही तर १७ ते १९ डिसेंबर दरम्यान तिरुपतीकडे ही मुसळधार पावसाची शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here