Washington Sundar: इंग्लडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत (Test Match) टीम इंडियाने (Team India) धडाकेबाज कामगिरी करत २-२ अशी बरोबरी साधत सामना जिंकला आहे. हा सामना जिंकण्यासाठी अनेक खेळाडूंनी महत्वाचं योगदान दिल. त्यातील एक खेळाडू (Player) म्हणजे वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar). मात्र तुम्हाला माहित आहे का या खेळाडूंचं नाव वॉशिंग्टन कसं पडलं ? जाणून घ्या…
इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये वॉशिंग्टन सुंदरने आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीने सर्वांच लक्ष वेधून घेतलय. मात्र जन्माने हिंदू असताना त्याच नाव एका ख्रिश्चन मुलासारखं का ठेवलं गेलं. या मागे एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे.
नक्की वाचा : “कबुतरखाने अचानक बंद करणे योग्य नाही”-देवेंद्र फडणवीस
‘वॉशिंग्टन’ या नावामागे काय स्टोरी आहे ? (Washington Sundar)
एम. सुंदर हे वॉशिंग्टन सुंदरचे वडील. त्यांना क्रिकेट खेळण्याची इच्छा होती. मात्र घरची परिस्थिती गरीब असल्याने सुंदर यांना शिक्षण आणि क्रिकेटचा खर्च झेपणारा नव्हता. तसेच चांगलं क्रिकेट खेळूनही त्यांना तामिळनाडूच्या मुख्य संघात स्थान मिळालं नाही.
एम. सुंदर हे लहान असताना ते स्टेडियममध्ये क्रिकेट खेळायला जायचे, त्यावेळी तिथे एक निवृत्त लष्करी अधिकारी यायचा. तो लहान मुलांना खेळताना पहायचा. त्यामध्ये एम. सुंदरही होते. एम सुंदर यांच्या खेळावर तो निवृत्त अधिकारी जास्त प्रभावित झाला. तू खेळ, मी तुला शिकविन असं तो निवृत्त अधिकारी सुंदर यांना म्हणाला. या निवृत्त अधिकाऱ्याने एम. सुंदर यांना क्रिकेटची किट घेऊन दिली. तसेच ते एम. सुंदर यांना सायकलवरुन शाळेत सोडायला आणि आणायला देखील जात असे. एम. सुंदर यांची मदत करणाऱ्या त्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच नाव होतं, पी.डी. वॉशिंग्टन. अश्या पद्धतीने सुंदर यांच आयुष्य पुढे सरकत गेलं. त्यानंतर त्यांच लग्न देखील झालं.
अवश्य वाचा : लाल किल्ल्याच्या सुरक्षेत गंभीर चूक,किल्ल्याच्या आत पोहोचला डमी बॉम्ब;सात पोलीस निलंबित
पी.डी. वॉशिंग्टन यांच्या नावावरून पडले नाव (Washington Sundar)
सुंदर यांच्या आयुष्यात देवदूत बनून आलेल्या या अधिकाऱ्याचं मात्र १९९९ साली निधन झालं. त्याच वर्षी एम. सुंदर यांच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्याच्या कानात जाऊन एम सुंदर बोलले श्रीनिवासन. मात्र थोड्या वेळाने त्यांना असं वाटलं की, या मुलाच नाव श्रीनिवास नको. ज्या माणसाने त्यांना आयुष्यात महत्त्वाच्या टप्प्यावर मदत केली, त्याच नाव द्यावं. म्हणून त्यांनी मुलाच नाव वॉशिंग्टन ठेवलं. पी.डी. वॉशिंग्टन यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून त्यांनी आपल्या मुलाला हे नाव दिल. पुढे तोच मुलगा वॉशिंग्टन सुंदर म्हणून क्रिकेट विश्वात नावारुपाला आला. अशी या नावामागची स्टोरी आहे.