Water conservation : जलसंधारण कामांमुळे खडकेवाके वृक्ष संपदेने बहरले

Water conservation : जलसंधारण कामांमुळे खडकेवाके वृक्ष संपदेने बहरले

0
Water conservation : जलसंधारण कामांमुळे खडकेवाके वृक्ष संपदेने बहरले
Water conservation : जलसंधारण कामांमुळे खडकेवाके वृक्ष संपदेने बहरले

Water conservation : नगर : राहाता (Rahata) तालुक्यातील खडकेवाके गावात कृषी विभाग, जिल्हा परिषद पाटबंधारे विभाग (Irrigation Department) व लोकसहभागाच्या माध्यमातून जलसंधारणाची (Water conservation) कामे झाल्याने गावातील पाण्याच्या स्रोतात वाढ झाली असून गावातील परिसर नैसर्गिक वृक्ष संपदेने बहरून गेला आहे.

अवश्य वाचा : व्यापाऱ्याला लुटणारे आरोपी जेरबंद

तलावातील गाळ काढण्यासाठी लोकसहभागातून तलाव खोलीकरण मोहीम

राहाता तालुक्यातील जिरायत भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खडकेवाके या सुमारे तीन हजार लोकवस्तीच्या गावात शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून १०० हेक्टर क्षेत्रावर बांध बंधिस्तचे कामे करण्यात आली आहेत. जिल्हा परिषद पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून गावातून वाहणाऱ्या कात नदीवर ३५ लाख रूपये खर्च करून ७ बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. यामुळे गावातील शेतीक्षेत्रात असलेल्या विहीरींच्या पाणी पातळीत वाढ झाली.
कात नदीवर असलेल्या जून्या साठवण तलावातील गाळ काढण्यासाठी लोकसहभागातून तलाव खोलीकरण मोहीम राबविण्यात आली. यामुळे आज गावालगत असलेल्या तलावात सुमारे २५ लाख लीटर पाण्याची साठवण झाली आहे.

खडकेवाके गावात पाच वर्षापूर्वी पाण्याचे होते दुर्भिक्ष्य (Water conservation)

गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी ही पायपीट करावी लागत होती, आज जलसंधारणाच्या झालेल्या कामांमुळे गावातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून बंद पडलेल्या हातपंपांना पाणी आले आहे. नागरिकांना पिण्यासाठी व घरगुती वापरासाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. एकेकाळी शेतात फक्त खरीप पीके घेतली जात होती आज गावात रब्बी व नगदी पीके घेतली जात असून ऊस, सोयाबीन पीक क्षेत्रात वाढ झाली आहे.