Water Festival | ८ ते २२ मार्च दरम्यान जिल्ह्यात साजरा होणार ‘जल महोत्सव’ – आनंद भंडारी

0

Water Festival | नगर : ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा अधिक शाश्वत व मजबूत करण्यासाठी आणि सामुदायिक सहभाग वाढवण्यासाठी ८ ते २२ मार्च २०२६ दरम्यान जिल्हयात सर्व ग्रामपंचायत स्तरावर ‘जल महोत्सव’ (Water Festival) राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी दिली.

हे वाचा – अमेरिकेकडून भारताला रशियन कच्चे तेल खरेदी करण्याची सूट; विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

जल उत्सवाची परंपरा

भंडारी म्हणाले, नदी उत्सवाच्या धर्तीवर जल उत्सवाची परंपरा विकसित करण्याच्या गरजेवर भर दिला होता. या दृष्टिकोनावर आधारित, राष्ट्रीय पेयजल विभाग, केंद्र शासन व नीती आयोगाच्या सहकार्याने २०२४ मध्ये २० महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये जल उत्सव प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आला होता. आता जल महोत्सव देशभर राबविण्यात येणार आहे.ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळजोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लीटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या योजना, स्टँड पोस्ट नळ पाणीपुरवठा योजना तसेच दरडोई किमान ४० लीटर प्रतिदिनने पूर्ण झालेल्या योजनांची दरडोई किमान ५५ लीटर प्रतिदिन प्रमाणे सुधारणात्मक पुनर्जोडणी करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

अवश्य वाचा – इंग्लंडला नमवत भारताचा फायनलमध्ये प्रवेश

सौरऊर्जा आधारित नळ पाणी पुरवठा

जिल्ह्यातील शाळा, अंगणवाड्या, अनुदानित आश्रमशाळा आणि शासकीय वसतिगृहांसाठी या योजनेतून नळजोडणी देण्यात येत आहे. एकाकी/आदिवासी वाडी-पाड्यांसाठी सौरऊर्जा आधारित नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. जल महोत्सव जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर अशा तीन स्तरांवर आयोजित करण्यात येणार आहे. गाव आणि पंचायत समिती स्तरावर ‘लोकजल उत्सव’ आयोजित केला जाईल, जो पूर्णपणे लोकसहभागावर आधारित असेल.गावात ग्रामसभा आणि पाणी समितीद्वारे प्रत्यक्ष कृतींवर भर दिला जाणार आहे. महिलांद्वारे जल गुणवत्ता चाचणी (फिल्ड टेस्टिंग किट वापरून) केली जाणार आहे. लोकप्रतिनिधी आणि नागरिक आपल्या गावातील जलस्रोतांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेणार आहेत. जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि स्वच्छता केली जाणार आहे.पाणी पुरवठा योजनांचे औपचारिक हस्तांतर आणि सामुदायिक शपथ दिली जाणार आहे.ग्रामपंचायत विकास आराखड्यात पाण्याचा समावेश केला जाणार असल्याचेही भंडारी यांनी यावेळी सांगितले.

सामुदायिक जीवनामध्ये खोलवर रुजलेली एक महत्वाची बाब आहे.ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा आधिक शाश्वत आणि मजबूत करण्यासाठी सामुदायिक लोकसहभाग वाढवण्यासाठी ८ ते २२ मार्च २०२ या कालावधीत जलमहोत्सव राबवला जाणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले म्हणाले.

हे पहा – VSR कंपनी मालक व्ही. के सिंगला सीआयडीकडून शाही पाहुणचार? रोहित पवारांचा खळबळजनक दावा

गाव, पंचायत समिती स्तरावर लोक जल उत्सव आयोजित केला जाईल.जो पूर्णपणे लोकसहभागावर आधारीत असणार आहे.पिण्याच्या पाण्याला सांस्कृतिक आणि सामाजिक प्राधान्य देणे, स्थानिक जलउत्सव संस्थांत्मक करण्यासाठी प्रोत्साहित करणे, राज्य ते गावस्तरापर्यंत विविध विभागांमध्ये समन्वय साधणे, पाणी गुणवत्ता, सौर ऊर्जा आणि देखभाल दुरूस्तीसाठी दिर्घकालीन आराखडा तयार करणे, आरोग्य, पोषण आणि महिला सक्षमीकरणाला जलसेवेशी जोडणे हा जलमहोत्सवाच्या उपक्रमामागचा उद्देश असल्याची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हितेंद्र चव्हाण यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here