
River water pollution : नगर: अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर (Jeur) परिसरात असलेल्या जनावरांच्या गोठ्यांमधील मलमूत्र हे खारोळी नदी पात्रात सोडले जात आहे. त्यामुळे खारोळी नदी (River Water pollution), त्यावरील बंधारे परिसरातील विहिरी, हातपंपांचे पाणी दूषित (Water pollution) झाल्याचा आरोप नागरिकांमधून करण्यात आला आहे.
नक्की वाचा : जगातील पहिली सापाचं विष शोधणारी किट विकसित; डॉ. शाम भट यांच्या प्रयत्नांना यश
परिसरातील गावांच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात
दुषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. खारोळी नदीचे पाणी पिंपळगाव माळवी तलावात जाते. पिंपळगाव माळवी तलावातून जेऊर गाव, तसेच परिसर धनगरवाडी, डोंगरगण, मांजरसुंबा गड अशा गावांना पाण्याचा पुरवठा केला जातो. पिंपळगाव तलावातच दूषित पाणी जात असेल, तर परिसरातील सर्वच गावांच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. दुषित पाण्यामुळे नागरिक व लहान बालक मोठ्या प्रमाणात आजारी पडले असल्याचाही गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
अवश्य वाचा : मोठी बातमी!अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार
संबंधित गोठ्यावर कारवाईची मागणी (River Water pollution)
जेऊर परिसरात जनावरांच्या गोठ्यांमुळे खारोळी नदीचे पाणी दूषित झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. नदीचे पाणी दूषित झाल्यामुळे परिसरातील विहिरी हातपंपांचेही पाणी पिण्यासाठी योग्य राहिले नसल्याचे सांगत ग्रामस्थांकडून संबंधित गोठ्यावर कारवाई करण्यासाठी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यानुसार आरोग्य विभागाकडून खारोळी नदी व परिसरातील विहिरी, हातपंपांच्या पाण्याची तपासणी करण्यात आली आहे. जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी म्हस्के वस्ती, तसेच चापेवाडी शिवारातील खारोळी नदीचे पाणी, तसेच परिसरातील विहिरींच्या पाण्याचे तपासणीसाठी प्रयोगशाळेत नमुने पाठविल्याची माहिती मिळाली. प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालानंतर आरोग्य विभागाकडून पाणी पिण्यास योग्य आहे की दूषीत याबाबत स्पष्ट केले जाणार आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून काय अहवाल येतो अन् त्यानंतर काय कारवाई होणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.


