Water shortage : नगरकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार 

Water shortage : नगर : नगर शहराच्या पाणी पुरवठ्यात वीस टक्के पाणी कपात (Water reduction) करण्याचा आदेश मुळा पाटबंधारे विभागाने (Mula Irrigation Department) दिला आहे.

0
Water shortage : नगरकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार
Water shortage : नगरकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार

Water shortage : नगर : नगर शहराच्या पाणी पुरवठ्यात वीस टक्के पाणी कपात (Water reduction) करण्याचा आदेश मुळा पाटबंधारे विभागाने (Mula Irrigation Department) दिला आहे. शहराच्या पाणी पुरवठ्यात ८१२० दशलक्ष लीटरची कपात होणार आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात नगरकरांना पाणी टंचाईचा (Water shortage) सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : युवकाकडून बसचालकाला मारहाण


यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती आहे. मुळा धरणही पूर्ण क्षमतेने भरले नाही. त्यातच आता समन्यायी पाणी वाटप धाेरणाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशाने मुळा धरणातून १.९६ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्यात आले आहे. धरणातील पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे पाणी याेजना व औद्योगिक पाणी वापरात २० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुळा धरणातून नगर शहरासह २२ पाणी योजनाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. यात महापालिकेच्या पाणी योजनेचा समावेश आहे. त्यामुळे यंदा पाण्याच्या काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.

नक्की वाचा : श्री गुरुदेव दत्तच्या जयघोषाने देवगड नगरी दुमदुमली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here