Water Shortage : नगर : एकेकाळी अहिल्यानगर (Ahilyanagar) शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पिंपळगाव माळवी तलावाने तळ गाठाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकंती करण्याची वेळ आली आहे. तलाव उशाला अन कोरड घशाला, अशी परिस्थिती नागरिकांची झाली आहे. नगर तालुक्यात पाणी टंचाईचे (Water Shortage) सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने तालुक्यात टँकर सुरु करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
अवश्य वाचा : ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्म समावेशक होते’; अजित पवारांनी खोडला संभाजी भिडेंचा दावा
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्यासाठी भटकंती सुरू
नगर तालुका हा पर्जन्यछायेचा भाग म्हणून ओळखला जातो. या भागात पावसाचे प्रमाण कमी राहते. तालुक्यात असलेल्या डोंगररांगांच्या कुशीत वसलेल्या विविध गावे भौगोलिक संरचनेनुसार डोंगरउतारावर वसलेल्या गावांना उन्हाळ्याच्या सुरुवातीला पाण्यासाठी भटकंती सुरू होत असते. पावसाळ्यात कितीही पाऊस झाला, तरी डोंगर उतारावर वसलेल्या तालुक्यातील मांजरसुंबा, इमामपूर, बहिरवाडी, दशमिगव्हण बरोबरच विविध वाड्या वस्त्यांवर पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणविण्यास सुरुवात झाली आहे. पंचायत समितीकडे टँकरसाठी प्रस्ताव दाखल होण्यास सुरवात झाली असून, लवकरच अनेक टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकर सुरु होणार आहेत.
नक्की वाचा : “देशातील प्रत्येक नागरिक स्वतःला ऑलिंपिक खेळाडू समजतो”,वाहतूक नियम न पाळणाऱ्यांना नितीन गडकरींचा टोला
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च (Water Shortage)
जिल्ह्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून कोट्यावधी रुपयांचा खर्च जलजीवन योजना अंतर्गत करण्यात येत आहे. या योजनेअंर्तगत गावागावात काम सुरु आहेत. काही गावात योजनेचे काम पूर्ण झाले आहे तर काही ठिकाणे अर्धवट आहेत. तर काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोपही नागरिकांमधून होत आहे. त्यामुळे यंदाही घशाची कोरड भागविण्यासाठी जिल्हा प्रशासनाला टँकरचे चाक सुरु ठेवावे लागणार आहे.
अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर, इमामपूर, ससेवाडी, बहिरवाडी, डोंगरगण, मांजरसुंबा, आगडगाव, अरणगाव, कापूरवाडी परिसरातील सर्वच तलाव कोरडेठाक पडले आहेत. विहिरी, कूपनलिकांना पाणी राहिले नाही. त्यामुळे महिलांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू झाली आहे. डोंगर रांगांमधील पाणी संपल्याने वन्य प्राणी पाण्याच्या शोधार्थ मानय वस्तीकडे भाव घेताना दिसून येत आहेत. त्यामुळे नगर तालुक्यासह जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकर सुरु करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.