Water supply : नगर शहराचा पाणीपुरवठा काेणत्याही क्षणी खंडित हाेणार

Water supply : नगर शहराचा पाणीपुरवठा काेणत्याही क्षणी खंडित हाेणार

0
Water supply

Water supply : नगर : पाटबंधारे विभागाची (Irrigation Department) पाणीपट्टीची रक्कम महापालिकेने थकवल्याने १५ फेब्रुवारीपर्यंत थकीत पाणीपट्टी अदा करण्याचे आदेश महापालिकेला देण्यात आले हाेते. अन्यथा काेणत्याही क्षणी पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला हाेता. तरी महापालिकेकडून (AMC) पाणीपट्टी रक्कम भरण्यात टाळाटाळ हाेत आहे. त्यामुळे आता शहराचा पाणीपुरवठा (Water supply) काेणत्याही क्षणी बंद हाेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हे देखील वाचा: आजी-नातवाचा खून करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा

तब्बल ७ कोटी ५५ लाखांची पाणीपट्टी थकली


नगर शहराला मुळा धरणातून पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्यात येताे. याकरिता महापालिकेला वर्षाकाठी जलसंपदा विभागाच्या मुळा पाटबंधारे विभागाला पाणीपट्टी द्यावी लागत असते. महापालिकेकडे पाणी पुरवठा मुळा पाटबंधारे विभागाची तब्बल ७ कोटी ५५ लाख रुपयांची पाणीपट्टी थकविली आहे. ही पाणीपट्टी भरण्याबाबत मुळा पाटबंधारे विभागाने महापालिकेला नोटीस काढली होती. तरी महापालिकेकडून पाणीपट्टी भरण्यासाठी दुर्लक्ष हाेत आहे.

नक्की वाचा: सर्वोच्च न्यायालयाने फिरवला निकाल! चंदीगडमध्ये महापौरपदी आपचा उमेदवार

पालिकेचा हलगर्जीपणा (Water supply)

या पालिकेच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामाेरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त हाेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here