Water supply : नगर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

Water supply : नगर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

0
Water supply

कोड रेड

Water supply : नगर : नगर शहर (Nagar City) पाणी वितरण व्यवस्थेची मुख्य जलवाहिनी (Water pipeline) नटराज चौक येथे फुटल्याने शहराचा पाणी पुरवठा (Water supply) तीन दिवस विस्कळीत राहणार आहे.

नक्की वाचा : ‘राज ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी फडणवीसांच्या विरोधात बोलावं’- रोहित पवार

गॅस लाईनच्या मशीनचा धक्का लागल्याने पाईपलाईन फुटली

शहर पाणी वितरण व्यवस्थेची मुख्य जलवाहिनी नटराज चौक ( जुने आर.टी.ओ. ऑफीस जवळ ) या ठिकाणी काल (सोमवारी) सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास गॅस पाईपलाईन टाकणाऱ्या खासगी ठेकेदाराच्या मशिनचा धक्का लागून फुटली. या जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम महापालिकेने तातडीने हाती घेतलेले आहे. त्यामुळे सोमवारी (ता. १२) सायंकाळी पाणी वाटप सुरू असलेल्या संपूर्ण स्टेशन रोड परिसर, सारसनगर व बुरुडगाव रस्ता परिसर या नागरी भागास पाणी पुरवठा करता आलेला नाही. या जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणी वाटप करण्यात येईल.

अवश्य वाचा: मनाेज जरांगेंच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक घ्या; मराठा आरक्षणावर शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन (Water supply)

आज (मंगळवारी) रोटेशन नुसार मंगलगेट, झेंडीगेट, रामचंद्र खुंट, दाळमंडई, जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, हातमपुरा, धरती चौक, बंगाल चौकी आदी नागरी भागाला पाणी पुरवठा करता आलेला नाही. या भागाला उद्या (बुधवारी) पाणी पुरवठा करण्यात येईल. बुधवार (ता. १४) सिद्धार्थ नगर, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रस्ता, आनंदी बाजार, तोफखाना, जुने महापालिका कार्यालय परिसर, पंचपीर चावडी, कापड बाजार, खिस्त गल्ली आदी भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या भागाला गुरुवारी (ता. १५) पाणी पुरवठा करण्यात येईल. तरी नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन नगर महापालिकेने केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here