Water Supply : अहिल्यानगर शहराचा पाणी पुरवठा तीन दिवस विस्कळीत

Water Supply : अहिल्यानगर शहराचा पाणी पुरवठा तीन दिवस विस्कळीत

0
Water Supply : अहिल्यानगर शहराचा पाणी पुरवठा तीन दिवस विस्कळीत
Water Supply : अहिल्यानगर शहराचा पाणी पुरवठा तीन दिवस विस्कळीत

कोड रेड

Water Supply : नगर : महावितरण कंपनीने (Mahavitaran Company) महत्त्वाच्या कामासाठी शनिवारी (ता. २२) शटडाऊन घेतला आहे. त्यामुळे अहिल्यानगर शहरातील पाणी पुरवठा (Water Supply in Ahilyanagar City) होणाऱ्या भागांना २२ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत एक दिवस विलंबाने पाणी पुरवठा (Water Supply) होणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

अवश्य वाचा : पाथर्डीतील निवडणूक चित्र बदलले; १४ अर्ज मागे, तिरंगी लढतीचे संकेत

येथे रविवारी (ता. २३) पाणीपुरवठा होईल

बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्ता, पाईपलाईन रस्ता, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकूंदनगर, केडगाव, नगर-कल्याण रस्त्यावरील शिवाजीनगर आदी भागांत आज (शनिवारी) पाणी पुरवठा होणार नाही. त्या ऐवजी रविवारी (ता. २३) पाणीपुरवठा होईल.

नक्की वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायतीच्या लढती निश्चित

येथे सोमवारी (ता. २४) पाणी पुरवठा (Water Supply )

सिद्धार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्ली गेट, नालेगाव, चितळे रस्ता, आनंदी बाजार, कापड बाजार, खिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने महापालिका कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रस्ता परिसर व सावेडी आदी भागांत रविवारी (ता. २३) पाणी पुरवठा होणार नाही. त्या ऐवजी सोमवारी (ता. २४) पाणी पुरवठा होईल.

मंगलगेट, रामचंद्र खुंट, झेंडी गेट, जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, डाळ मंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी, गुलमोहर रस्ता, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हिल हडको, प्रेमदान हडको, टीव्ही सेंटर परिसर, मुन्सिपल हडको, स्टेशन रस्ता, आगरकर मळा, विनायक नगर आदी भागांना सोमवारी (ता. २४) ऐवजी मंगळवारी (ता. २५) पाणी पुरवठा होईल. या काळात पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.