कोड रेड
Water Supply Cut Off : नगर : अहिल्यानगर एमआयडीसी पाणी पुरवठा (Water Supply) योजनेतील जलवाहिनीचे पाईप बदल्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या पाणी योजनेकडून करण्यात येणारा पाणी पुरवठा हा शनिवारी (ता. २९) रोजी सकाळपासून ३६ तास, अथवा काम संपेपर्यंत पाणी पुरवठा बंद (Water Supply Cut Off) राहणार आहे. अशी माहिती एमआयडीसीच्या (MIDC) पाणी पुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
अवश्य वाचा : श्रीगोंद्यातील कुटुंबावर काळाचा घाला; ट्रॅक्टर पलटी होऊन दोन चिमुकले जागीच ठार
२९ नोव्हेंबर रोजी सकाळपासून ३६ तास बंद राहणार
अहिल्यानगर तालुक्यातील शिंगवे परिसरात वारंवार पाण्याची गळती होत असल्याने पाईपलाईनचे काम (ता. २९) हाती घेण्यात येणार आहे. हे काम उपविभागामार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे या पाणी योजनेकडून करण्यात येणारा पाणी पुरवठा हा २९ नोव्हेंबर रोजी सकाळपासून ३६ तास बंद राहणार आहे. त्यामुळे एमआयडीसीच्या पाणी पुरवठा योजनेतून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अहिल्यानगर औद्योगिक क्षेत्र, सुपा, पारनेर औद्योगिक क्षेत्र, सुपा, पारनेर औद्योगिक उद्यान क्षेत्र, सैन्य आस्थापना, तसेच काही ग्रामपंचायती यांना पाणी पुरवठा करण्यात येतो.
नक्की वाचा : बोल्हेगाव परिसरात बिबट्याचा हल्ला
पुढील १ दिवस पाणीपुरवठा कमी दाबाने सुरू (Water Supply Cut Off)
त्यामुळे पाणीपुरवठा योजनेचा पाणी उपसा बंद राहणार आहे. २९ नोव्हेंबरला सकाळनंतर ३६ तास, अथवा काम संपेपर्यंत बंद राहील, तसेच पुढील एक दिवस पाणीपुरवठा कमी दाबाने सुरू राहील. त्यामुळे योजनेच्या ग्राहकांनी या कालावधी पुरेसा पाणीसाठा करून घ्यावा, असे अवाहन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.



