कोड रेड
Water Supply Disrupted : नगर : नगर शहर पाणी पुरवठा (Water supply) योजनेवरील महत्त्वाच्या दुरुस्तीच्या कामासाठी एक दिवसांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. परिणामी मुळा नगर व विळद येथील वीज पुरवठा खंडित राहणार आहे. त्यामुळे नगर शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत (Water Supply Disrupted) राहणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने (AMC) प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
हे देखील वाचा: “पुन्हा दमदाटी केली तर शरद पवार म्हणतात मला”; पवारांचा आमदार सुनील शेळकेंना इशारा
या भागात शटडाऊन (Water Supply Disrupted)
हा शटडाऊन शनिवारी (ता. ९) सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत राहणार आहे. त्यामुळे शनिवारी (ता. ९) पाणीपुरवठा होणाऱ्या शहरातील बोल्हेगाव, नागापूर, सावेडी, उपनगरातील गुलमोहर रस्ता, पाईपलाईन रस्ता, लक्ष्मी नगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर तसेच विनायकनगर, आगरकर मळा, स्टेशन रस्ता, केडगाव, नगर-कल्याण रस्त्यावरील शिवाजीनगर परिसर आदी भागांत पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. त्या ऐवजी या भागाला रविवारी (ता. १०) पाणी पुरवठा होईल.
नक्की वाचा: कोपरगाव शहरात घरफोडीचे सत्र पुन्हा सुरू
या भागाला पाणी पुरवठा होणार नाही (Water Supply Disrupted)
रविवारी (ता. १०) पाणी पुरवठा होणाऱ्या नगर शहरातील मध्यवर्ती भागातील सिद्धार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रस्ता, आनंदीबाजार, कापडबाजार, खिस्तगल्ली, पंचपीर चावडी, जुनी महापालिका परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रस्ता परिसर, सारसनगर, बुरुडगाव रस्ता, सावेडी आदी भागाला पाणी पुरवठा होणार नाही. त्या ऐवजी या भागाला सोमवारी (ता. ११) पाणी पुरवठा होईल.
सोमवारी (ता. ११) पाणी पुरवठा होणाऱ्या नगर शहरातील मध्यवर्ती भागातील मंगलगेट, रामचंद्र खुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, गुलमोहर रस्ता, बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी व प्रोफेसर कॉलनी परिसर आदी भागाला पाणी पुरवठा होणार नाही. त्या ऐवजी मंगळवारी (ता. १२) पाणी पुरवठा होणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहनही महापालिका प्रशासनाने केले आहे.