कोड रेड
Water Supply Disrupted : नगर : नगर शहर पाणी पुरवठा (Water supply) योजनेवरील महत्त्वाच्या दुरुस्तीच्या कामासाठी उद्या (बुधवारी) एक दिवसांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. परिणामी मुळा नगर व विळद येथील पाणी उपसा बंद राहणार आहे. त्यामुळे नगर शहराचा (Nagar City) पाणी पुरवठा एक दिवस विलंबाने (Water Supply Disrupted) होणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
नक्की वाचा : नगरमध्ये पुन्हा माणुसकीला काळिमा फासणारी घटना; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडितेची आत्महत्या
‘या’ भागात शटडाऊन
हा शटडाऊन बुधवारी (ता. २०) सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत राहणार आहे. त्यामुळे बुधवारी (ता. २०) पाणीपुरवठा होणाऱ्या शहरातील बोल्हेगाव, नागापूर, सावेडी, उपनगरातील गुलमोहर रस्ता, पाईपलाईन रस्ता, लक्ष्मी नगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर तसेच बुरुडगाव रस्ता, सारसनगर, कोठी, केडगाव, नगर-कल्याण रस्त्यावरील शिवाजीनगर परिसर आदी भागांत पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. त्या ऐवजी या भागाला गुरुवारी (ता. २१) पाणी पुरवठा होईल.
हे देखील वाचा : डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, महाराष्ट्रात टीव्हीवर चार मनोरुग्ण दिसतात
‘या’ भागाला पाणी पुरवठा होणार नाही (Water Supply Disrupted)
गुरुवारी (ता. २१) पाणी पुरवठा होणाऱ्या नगर शहरातील मध्यवर्ती भागातील मंगलगेट, रामचंद्र खुंट, झेंडीगेट, जुनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळूबागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात तसेच गुलमोहर रस्ता, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हिल हाडको, प्रेमदान हाडको, टीव्ही सेंटर परिसर, मुन्सिपल हाडको, विनायक नगर, आगरकर मळा, स्टेशन रस्ता, कायनेटिक चौक परिसर आदी भागाला पाणी पुरवठा होणार नाही. त्या ऐवजी या भागाला शुक्रवारी (ता. २२) पाणी पुरवठा होईल.
शुक्रवारी (ता. २२) पाणी पुरवठा होणाऱ्या नगर शहरातील मध्यवर्ती भागातील म्हणजेच सिद्धार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रस्ता, आनंदीबाजार, कापडबाजार, खिस्तगल्ली, पंचपीर चावडी, जुनी महापालिका परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रस्ता परिसर, सारसनगर, बुरुडगाव रस्ता, सावेडी आदी भागाला पाणी पुरवठा होणार नाही. त्या ऐवजी शनिवारी (ता. २३) पाणी पुरवठा होणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहनही महापालिका प्रशासनाने केले आहे.