Water Supply Disrupted : अहिल्यानगर शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत

Water Supply Disrupted : अहिल्यानगर शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत

0
Water Supply Disrupted : अहिल्यानगर शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत
Water Supply Disrupted : अहिल्यानगर शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत

कोड रेड
Water Supply Disrupted : नगर : महावितरण (Mahavitaran) कंपनीकडून देखभाल व दुरुस्तीच्या कामानिमित्त मुळा धरण (Mula Dam) परिसरातील विद्युत वाहिनीचा विद्युत पुरवठा शनिवारी (ता. ७) सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत बंद ठेवण्यात आला आहे. याच कालावधीत महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा योजनेवरील महत्त्वाची दुरुस्तीकामे होणार आहेत. त्यामुळे नगर शहरातील विविध भागांत एक दिवस विलंबाने पाणी पुरवठा (Water Supply Disrupted) होणार आहे. 

नक्की वाचा : ‘विरोधकांना मी पुन्हा माफ केले हाच माझा बदला’- देवेंद्र फडणवीस

या भागाला पाणी पुरवठा होणार नाही

शनिवारी (ता. ७) मुळानगर विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाहीत. त्यामुळे शनिवारी (ता. ७) बोल्हेगाव, नागापूर, सावेडी, पाईपलाईन रस्ता, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर, सारसनगर, बुरुडगाव रस्ता, केडगाव, नगर-कल्याण रस्त्यावरील शिवाजीनगर परिसर आदी भागांत सकाळी ११ नंतरच्या पाणी वाटपाच्या भागाला पाणी पुरवठा होणार नाही. त्या ऐवजी रविवारी (ता. ८) होईल. 

अवश्य वाचा : नगर-पुणे इंटरसिटी लाईनचे काम सुरू करा; खासदार लंके यांची संसदेत मागणी

आदी भागांना पाणी पुरवठा होणार नाही (Water Supply Disrupted)

रविवारी (ता. ८) रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागाला म्हणजेच मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडी गेट, जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, डाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रस्ता, प्रोफेसर कॉलनी, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, टीव्ही सेंटर परिसर, म्युन्सिपल हाडको, स्टेशन रस्ता, आगरकर मळा, विनायक नगर आदी भागांना पाणी पुरवठा होणार नाही. त्या ऐवजी सोमवारी (ता. ९) पाणी पुरवठा होईल.
सोमवारी (ता. ९) पाणी पुरवठा होणाऱ्या शहराच्या मध्यवर्ती भागाला म्हणजे सिद्धार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्ली गेट, नालेगाव, चितळे रस्ता, आनंदीबाजार, कापड बाजार, खिस्तगल्ली, पंचपीर चावडी, जुने महापालिका कार्यालय, माळीवाडा, बालिकाश्रम परिसर व सावेडी या भागाला पाणी पुरवठा होणार नाही. त्या ऐवजी मंगळवारी (ता. १०) पाणीपुरवठा करण्यात येईल. तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.