Water Tanker : नगर : जिल्ह्यात पाणी टँकरला (Water Tanker) मागणी वाढत आहे. जिल्ह्यातील डोंगराळ भागातील गावांना पाणी टंचाई (Water Shortage) जाणवत आहे. जिल्ह्यातील ७१ हजार नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून असून ३७ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये सर्वाधिक टँकर संगमेनर तालुक्यात सुरु आहेत.
नक्की वाचा : आरोग्य सेवेचे सशक्तीकरण ‘मिशन मोड’वर
जिल्ह्यात ७१ हजार ९३५ नागरिकांना ३७ टँकरने पाणीपुरवठा
एप्रिलच्या प्रारंभीच जिल्ह्यात ७१ हजार ९३५ नागरिकांना ३७ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. संगमनेर, नगर पाथर्डी तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाणी टँकर सुरू आहे. जिल्ह्यातील २९ गावे ८८ वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. संगमनेर तालुक्यात १६ गावे आणि ३१ वाड्यांमधील ३० हजार १३९ लोकांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. संगमनेरमध्ये १६ टँकरच्या माध्यमातून ४८ खेपा मंजूर आहेत.
अवश्य वाचा : रामनवमी मिरवणूक; मंडळ पदाधिकारी व डीजे मालक-चालकांविरूध्द गुन्हा
संगमनेर तालुक्यात दोन विहिरींचे अधिग्रहण (Water Tanker)
तालुक्यातील पठार भागातील गावांचा यामध्ये सर्वाधिक समावेश आहे. नगर तालुक्यातील ५ गावे १६ वाड्या-वस्त्यांवरील ८ हजार ९९६ नागरिकांना ६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या टँकरमार्फत १४ खेपा मंजूर आहेत. पाथर्डी तालुक्यातील ८ गावे ४१ वाड्या-वस्त्यांवरील २७ हजार ८०० नागरिकांना ११ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. २६ खेपा मंजूर आहेत. सर्व टँकर हे शासकीय विभागांचे आहेत. संगमनेर तालुक्यात दोन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यापैकी एक विहिर ही एका गावासाठी तर एक विहिर ही टँकर भरण्यासाठी अधिग्रहण करण्यात आली आहे.