नगर : उन्हाळा सुरु झाल्याने सध्या धरणातील पाणीसाठा (Water storage) कमी झाला आहे. त्यामुळे मुंबईत देखील पाणीपुरवठा कमी झाला असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. १० एप्रिलपासून मुंबईतील (Mumbai) वॉटर टँकर सेवा बंद (Water tanker service closed) होणार आहे. मुंबई महानगरपालिकेने केंद्रीय भूजल प्राधिकरणासाठी नवे नियम लागू केल्याने मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने हा मोठा निर्णय घेतला आहे.
नक्की वाचा : कलाविश्वावर शोककळा!ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचं निधन
मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा मोठा निर्णय (Water Tanker Service in Mumbai)
मुंबईतील विहीर आणि बोअर मालकांनी केंद्रीय भूजल प्राधिकरण नियमानुसार एनओसी घ्यावी, अन्यथा पाणीपुरवठा बंद होईल, अशी नोटीस मुंबई पालिकेकडून आली आहे. त्यामुळे अनेक विहीर आणि बोअरवेल मालकांसमोर मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. बोअरवेल मालकांकडे एनओसी नसल्याचे आढळून आल्याने पाणीपुरवठा कसा करायचा? या चिंतेमुळे मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने या निर्णयाविरोधात वॉटर टँकर सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील विविध भागात आधीच पाणी पुरवठा सुरळीत नाही. त्यातच वॉटर टँकर बंद झाल्यास मुंबईकरांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
अवश्य वाचा : संगमनेरच्या १०७ वर्षांच्या आजीबाई सांगतात दीर्घायुष्याचे रहस्य!
मुंबईत पाण्याचे संकट (Water Tanker Service in Mumbai)
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सातही धरणांतील पाणीसाठा ३३.५७ टक्क्यांवर आला आहे. वातावरणातील उष्मा वाढू लागल्याने पाणीसाठा जुलै अखेर पर्यंत पुरवावा लागणार आहे. मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागू नये म्हणून मुंबई महापालिकेने आधीच राज्य सरकारकडे राखीव साठ्याच्या वापरासाठी विनंती केली आहे.ऊर्ध्व वैतरणा धरणातून ६८ हजार दशलक्ष लिटर तर भातसा धरणातून १ लाख १३ हजार दशलक्ष लिटर राखीव साठ्याच्या पाण्याची मागणी नोंदवली आहे. पाऊस लांबल्यास मुंबई महापालिकेला या राखीव साठ्याचा वापर करावा लागणार आहे.