काेड रेड
Weather : नगर : नगर जिल्ह्यात १४ ते १६ मे राेजी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस (Stormy Rain) बरसणार आहे, असा इशारा भारतीय हवामान (Weather) विभागाने दिला आहे. त्यामुळे विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, आपत्तीच्या सूचनांचे काटेकाेर पालन करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन (District Disaster Management) प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले.
हे देखील वाचा : मुंबईत तुफान वादळ
जाेरदार पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार १४ ते १६ मे राेजी विजांच्या कडकडाटासह वादळी वारा व हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस हाेणार आहे. या कालावधीत शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. वादळी वारा, मेघगर्जनेसह विजा पडणे व जाेरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
नक्की वाचा : मतदान केंद्रावर महायुतीच्या उमेदवाराच्या स्लिप; मविआच्या उमेदवाराकडून संपात व्यक्त
सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा (Weather)
नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. धाेकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये, मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस ठाण्याशी अथवा दूरध्वनी क्र. १०७७ (टोल फ्री) वर संपर्क साधावा.