Cold Weather:राज्यभरात थंडीची चाहूल,हवामान विभागाचा अंदाज 

0
Cold Weather:राज्यभरात थंडीची चाहूल,हवामान विभागाचा अंदाज 
Cold Weather:राज्यभरात थंडीची चाहूल,हवामान विभागाचा अंदाज 

नगर : पावसाळा संपताच राज्यभरात थंडीची (Cold Weather) चाहूल लागली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे थंडी जाणवायला सुरुवात झाली. किमान तापमान अनेक ठिकाणी २० अंश सेल्सिअसच्याही खाली गेले असून पहाटे हवेत गारवा जाणवत आहे. काही ठिकाणे वगळता कमाल तापमानही ३४ अंश सेल्सिअसच्या आत आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण- मध्य महाराष्ट्रात (Maharashtra) ढगाळ वातावरण तयार झाले आहे. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

नक्की वाचा : एकनाथ शिंदेंच्या संपत्तीत पाच वर्षांत तिप्पट वाढ!

नगरसह उत्तर महाराष्ट्रात १८ अंश सेल्सिअसपर्यंत (Cold Weather)

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडून राज्यात थंड वारे येत आहेत. त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात घट झाली आहे. मध्यरात्री आणि पहाटे हवेत गारवा जाणवत आहे. राज्यात अनेक ठिकाणी २० अंश सेल्सिअसच्याही खाली तापमान गेले आहे. तर कमाल तापमान काही ठिकाणे वगळता ३४ अंश सेल्सिअसच्या खाली आहे. मागील दोन दिवसांपासून नाशिक, नगरसह उत्तर महाराष्ट्रात १८ अंश सेल्सिअसपर्यंत पारा आला आहे. मंगळवारी (ता.२९) महाबळेश्वर येथे १५.४ अंश सेल्सिअस इतक्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे.

अवश्य वाचा :  सुनीता विल्यम्स यांनी अंतराळातून दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा!  

हलक्या पावसाचा अंदाज (Cold Weather)

उत्तरेकडून येणारे थंड वारे, हवेतील बाष्प आणि पहाटे कमी होणाऱ्या तापमानामुळे राजाच्या बहुतेक भागात दाट धुके पडत आहे. अनेक ठिकाणी सकाळी आठ वाजेपर्यंत धुके पहायला मिळत आहे. राज्यात उत्तर भारतातून काही प्रमाणात थंड वारे येत आहेत. तर, ईशान्य वारे राज्यात येताना बंगालच्या उपसागरातून बाष्प सोबत आणत आहेत. या दोन्ही वाऱ्यांचा मिलाफ दक्षिण महाराष्ट्रावर होत आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण तयार झाले. पुढील तीन– चार दिवस दक्षिण कोकण आणि दक्षिण – मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. या भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here