Weather Update: महाराष्ट्रासह अनेक राज्यात पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस 

.येत्या २४ तासांत बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चक्रीवादळ (Hurricane) तयार होण्याची शक्यता आहे.

0
महाराष्ट्रासह अनेक राज्यात पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस

Weather Update : नगर : महाराष्ट्रासह देशभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र यामुळे हवामानात (Weather Forecast) मोठा बदल होताना दिवस आहे. येत्या २४ तासांत बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चक्रीवादळ (Hurricane) तयार होण्याची शक्यता आहे.

नक्की वाचा : आजपासून एलपीजी गॅस महागला !

आजपासून (ता.२) ते ४ डिसेंबर या काळात देशात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामुळे आज आणि उद्या महाराष्ट्रासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पुढील २४ तासांत अधिक तीव्र होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : ‘मुक्ताई’ चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित 

हवामानात झालेल्या बदलामुळे पुढील दोन दिवसांत मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात विजांचा गडगडाट आणि  वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे पर्वतीय प्रदेशात बर्फवृष्टी होईल आणि लगतच्या मैदानी प्रदेशात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. १ डिसेंबर रोजी पहाटे ५. ३० वाजता दक्षिण-पूर्व लगतच्या नैऋत्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं आहे.

हे कमी दाबाचे क्षेत्र पुढील २४ तासांत चक्रीवादळात रुपांतरित होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे दक्षिण आंध्र प्रदेश आणि लगतच्या उत्तर तामिळनाडू किनारपट्टीला याचा धोका आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. या खराब हवामानामुळे तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल किनारपट्टीसाठी हवामान कार्यालयाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे २ ते ४ डिसेंबर या काळात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here