नगर: राज्यभरात सगळीकडे थंडीचा कडाका (Cold weather) वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमान १० अंशांच्या खाली (Temperature below 10 degrees) घसरलं आहे. मुंबईतही किमान तापमान १७.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलं आहे. पावसाळा संपताच थंडीची सुरुवात झाल्यामुळे नागरिकांना याचा अधिक त्रास जाणवत आहे. जळगावमध्ये सर्वांत कमी ७.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. येत्या चार दिवसांपर्यंत ही थंडी कायम राहण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा: मुंबईतील वानखेडे स्टेडियम कसं तयार झालं? जाणून घ्या सविस्तर…
राज्यभरात कशी आहे स्थिती? (Weather Update)

कोकण विभागापेक्षा महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात तापमानात अधिक बदल झाला आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही ठिकाणी तापमान १० अंशांच्या खाली गेले होते. भारतीय हवामान विभागाच्या नोंदीनुसार, जळगावमध्ये सर्वात कमी ७.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेलं, जे सरासरीपेक्षा ७.७ अंशांनी कमी होते. यवतमाळ जिल्ह्यातील तापमान सरासरीपेक्षा ७.४ अंशांनी घसरलं आणि ९.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
अवश्य वाचा: पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा! खरडलेल्या जमिनींसाठी मिळणार मोफत मातीसह गाळ आणि मुरूम
अहिल्यानगरमध्ये तापमान १० अंशापेक्षा कमी तापमान (Weather Update)
अहिल्यानगर, पुणे, मालेगाव, नाशिक, गोंदिया आणि यवतमाळ यांसारख्या ठिकाणी किमान तापमान १० अंशांपेक्षा कमी होते. महाबळेश्वरमध्ये तापमान १० अंश सेल्सिअस होते, तर सातारा, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि नागपूर येथे ते १० ते ११ अंशांदरम्यान होते. निवृत्त हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांच्या अंदाजानुसार, ही थंडी येत्या शुक्रवार, २१ नोव्हेंबरपर्यंत अशीच कायम राहण्याची शक्यता आहे. बुधवार, १९ नोव्हेंबरला थंडीचा कडाका अधिक जाणवेल. २२ नोव्हेंबरनंतर वाऱ्यांच्या दिशेत बदल झाल्यास थंडीची तीव्रता कमी होऊ शकते.



