Weather Update: राज्यात उष्णतेची लाट; मात्र ‘या’ दिवसापासून पावसाचा अंदाज

महाराष्ट्र सध्या उन्हाने होरपळून निघत आहेत. मात्र तरीही मार्च अखेरीस काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.आता पुन्हा एकदा राज्यातील तापमान वाढण्यास सुरवात झाली आहे.

0
Weather Update
Weather Update

नगर : महाराष्ट्र सध्या उन्हाने होरपळून निघत आहेत. मात्र तरीही मार्च अखेरीस काही ठिकाणी पावसाने हजेरी (Rain Update) लावली आहे.आता पुन्हा एकदा राज्यातील तापमान वाढण्यास सुरवात झाली आहे. विदर्भात तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सिअस पलीकडे गेला. त्यातच भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) आठवड्याच्या अखेरीस पावसाचा अंदाज व्यक्त केला असला तरीही येत्या दोन-तीन दिवसांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील देण्यात आला आहे.

नक्की वाचा : भाजपला धक्का; खासदार उन्मेष पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत  

येत्या दोन-तीन दिवसांत तापमान वाढणार (Weather Update)

xr:d:DAFvzVEvC2U:1456,j:260506588667861159,t:24040312

विदर्भातील  तापमान हे वेगाने वाढ होत आहे. कमाल तापमानासह किमान तापमान देखील वाढत आहे. येत्या दोन-तीन दिवसांत तापमानाच्या पाऱ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यात  भारतीय हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. मंगळवारी (ता.२) विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद ब्रह्मपुरी येथे ४२.३ अंश सेल्सिअस इतकी नोंदवण्यात आली आहे. तर वर्धा, यवतमाळ, वाशीम आणि अकोला शहरात तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअस पेक्षा अधिक होता. भारतीय हवामान खात्याने एप्रिल आणि मे महिन्यात तापमानात आणखी वाढ होण्याची इशारा दिला आहे.

अवश्य वाचा : लोकसभा निवडणुकीत माझा फोटो,नाव कुणीही वापरू नयेत-मनोज जरांगे

शुक्रवारपासून अवकाळी पावसाचा अंदाज (Weather Update)

सरासरी पेक्षा तापमान अधिक राहणार असल्याने यावर्षी विदर्भात तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसहुन अधिक राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, तापमान वाढीचा आलेख चढत असताना येत्या शुक्रवारपासून (ता.५) चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकण आणि मराठवाड्यासह विदर्भातही पावसाच्या तुरळक सरी कोसळतील.मात्र यामुळे तापमानात फारसा फरक पडणार नसल्याचा अंदाज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here