नगर : एकीकडे उन्हाळा सुरू असताना दुसरीकडे महाराष्ट्रात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) बरसत आहे. आता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्हे वगळता राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पाऊस पडेल असा ‘यलो अलर्ट’ (Yellow Alert) आज (ता.२३) हवामान खात्याने दिला आहे. अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर येथे गारपीट होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
नक्की वाचा : यशस्वीची ‘यशस्वी’ खेळी; शतक ठोकत मुंबईला नमवलं
मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा (Weather Update)
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, पालघर, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी हवामानाचा कोणताही इशारा नाही. राज्यातील उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस किंवा गारपीट होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. दक्षिण छत्तीसगड पासून विदर्भातील चक्राकार वारे, कर्नाटक ते दक्षिण केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने आज (ता. २३) विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत वादळी पावसासह गारपिटीचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
अवश्य वाचा : लष्कराच्या दोन हेलिकॉप्टरची हवेत धडक; १० जणांचा मृत्यू
ज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कायम (Weather Update)
राज्यात वाशीम येथे उच्चांकी ४२.२ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ४० अंशांच्या पार गेले आहे. तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांची वाढ झाल्याने वाशीम येथे उष्णतेची लाट आहे. अकोला, धुळे, गडचिरोली, वर्धा येथे तापमान ४२ अंशांच्या वर आहे. सोमवारी (ता. २३) मुंबईसह कोकणात उष्ण व दमट हवामानाचा, तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याचा अंदाज आहे.