Wedding Ceremony : अंबानींच्या लग्नसोहळ्यापेक्षाही जास्त खर्च झालाय ‘या’ शाही विवाह सोहळ्यात!

Wedding Ceremony : अंबानींच्या लग्नसोहळ्यापेक्षाही जास्त खर्च झालाय 'या' शाही विवाह सोहळ्यात!

0
Royal wedding ceremony

Wedding Ceremony : नगर : सध्या सोशल मीडियासह सर्व प्रसारमाध्यमांवर अनंत अंबानी (Anant Ambani) यांच्या विविह सोहळ्याची (Wedding Ceremony) व त्यामध्ये सहभागी होणाऱ्या पाहुण्यांची जोरदार चर्चा आहे. अंबानी परिवारातील शाही सोहळ्यावर अनेक कोटींचा खर्च केला जात आहे. अनेक नामांकित कलाकारांच्या सहभागासाठी कोटींचे मानधन देऊन आमंत्रित केल्याची मोठी चर्चा दररोज सोशल मीडियावर (Social media) पाहण्यास मिळत आहे. पण इतिहासात असा एक शाही विवाह सोहळा पार पडलेला आहे, की ज्यामध्ये झालेल्या खर्चाची व व्यवस्थेची आजपर्यंत कोणीही बरोबरी करू शकलेले नाहीये. तो विवाह सोहळा म्हणजे तत्कालीन मुघल बादशहा शाहजहान यांचा मोठा मुलगा दारा शुकोह व नादिरा बानो यांचा होय.

Royal wedding ceremony

हे देखील वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचं उद्घाटन

मुमताज महल यांच्या मृत्यूनंतरचा पहिला सोहळा (Wedding Ceremony)


दारा शुकोहची सावत्र आई मुमताज़ महल हिच्या मृत्यूनंतर एका वर्षानंतर दारा शुकोहचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यामुळेच या विवाहाची सर्व तयारी त्याची बहीण जहाँआरा हिने केली होती. दारा शुकोहला आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला. विद्वान अशी त्याची ख्याती असली तरी त्याने आपल्या विनम्र स्वभावाने इतर मुघल सम्राटांपेक्षा आपले वेगळेपण सिद्ध केले होते.

नक्की वाचा: मराठ्यांनी पीएम मोदींविरोधातच थाेपटले दंड; वाराणसीतून एक हजार उमेदवारी अर्ज दाखल करणार

त्या काळी तब्बल ३२ लाख रुपये खर्च (Wedding Ceremony)


इतिहासात दारा शुकोहने आपल्या भव्य दिव्य विवाह सोहळ्यासाठी महत्त्वाचे स्थान मिळवले आहे. दारा शुकोहचा विवाह परंपरा आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक मानला जातो. ऐतिहासिक दस्तऐवजांनुसार दारा शुकोहच्या लग्नासाठी त्या काळी तब्बल ३२ लाख रुपये खर्च करण्यात आले होते. शाहजहानची मोठी मुलगी जहाँआरा हिने या भव्य सोहळ्यासाठी तिच्या स्वत:कडची १६ लाख रुपयांची रक्कम खर्च केली होती. लग्नसोहळा आठ दिवस चालला आणि एकट्या वधूच्या पेहरावाची किंमत आठ लाख होती. दाग-दागिने, मौल्यवान रत्न असा एकूण ७ लाख ५० हजार इतका खर्च आला आहे. १८ लाख रुपये प्राथमिक विधींवर खर्च करण्यात आले. नर्तक, संगीतकार यांच्यावर १० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती. उत्तम पोशाख, चांदीची भांडी, विविध देशांमधून मागविलेल्या भेटवस्तू यांवर ६ लाख ४० हजार इतका खर्च करण्यात आला होता. इराक, अरब, तुर्कमेनिस्तानवरून लग्नासाठी खास घोडे मागविण्यात आले होते. दिवाण-ए-आममध्ये लग्नाच्या भेटवस्तूंचे प्रदर्शन आयोजित केले गेले होते.

ऐतिहासिक सोहळ्याचे चित्रण
मुघल कालीन लघुचित्रांमध्ये या विवाह सोहळ्याचे चित्रण करण्यात आले आहे. या चित्रात शाहजहान आलिशान सज्जात बसला आहे. राजकुमार दारा शुकोहच्या डोक्याला तो सेहरा बांधत आहे. हा सेहरा साधा सुधा नसून मोती, माणिक, पाचूजडित आहे. या रत्नजडित सेहऱ्याने या समारंभाची शोभा वाढविल्याचा संदर्भ ‘पातशाहनामा’ या ग्रंथात आढळतो. भारतीय प्रथेनुसार या मुघल राजकुमाराने शुभशकुन म्हणून वडिलांच्या हातून सेहरा बांधल्याचाही उल्लेख करण्यात आलेला आहे.

आतिषबाजी
या शाही विवाह सोहळ्यामध्ये आठ दिवस जेवणाची मेजवानी देण्यात आली. यासोबतच लग्नाच्या दिवशी एवढी आतषबाजी करण्यात आली होती की त्यावेळी रात्री सुद्धा दिवस असल्यासारखा आभास निर्माण झाल्याचा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांवर आढळतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here