West Bengal Election Clashes : पश्चिम बंगालमध्ये राडा;तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी भाजप उमेदवाराला घेरलं तर एकीकडे ईव्हीएम पाण्यात

तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप उमेदवार तापस रॉय यांना घेराव घातला. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

0
West Bengal Election Clashes
West Bengal Election Clashes

नगर : लोकसभा (Loksabha Election) अखेरच्या म्हणजेच सातव्या टप्प्यात आज पश्चिम बंगालमध्ये मतदान होत आहे. येथील एकूण ९ जागांसाठी सकाळीपासून मतदानाला (Voting) सुरुवात झाली आहे. यादरम्यान, कोलकाता नॉर्थ लोकसभा मतदारसंघात बोगस मतदान होत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे मतदान केंद्रावर चांगलाच गोंधळ उडाला होता.

नक्की वाचा : हश मनी’ प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प दोषी ; ‘या’ दिवशी होणार शिक्षा

तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा भाजप उमेदवार तापस रॉय यांना घेराव (West Bengal Election Clashes)

तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप उमेदवार तापस रॉय यांना घेराव घातला. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. पोलिसांनी वेळीच मधस्थी करत हा वाद मिटवला. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भाजप नेत्यांकडून बोगस मतदान होत असल्याचा आरोप तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. दुसरीकडे भाजप उमेदवार तापस रॉय यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. “तृणमूल काँग्रेसचा पोलिंग एजंट मतदान केंद्रावर उपस्थित होता, मला बोगस मतदानाबाबत काहीच कल्पना नाही”,असं रॉय यांनी सांगितलं.

अवश्य वाचा : अंतरवाली सराटीत ‘संघर्षयोद्धा-मनोज जरांगे पाटील’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच

कुलताली येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशीन पाण्यात (West Bengal Election Clashes)

पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानापासूनच भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठे वाद होत आहेत. शनिवारी सातव्या टप्प्यातील मतदान सुरू होताच दक्षिण परागणा जिल्ह्यात भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा मोठा वाद झाला. कुलताली येथील मतदान केंद्रावर काही पोलिंग एजंटना परवानगी नाकारण्यात आल्याने जमाव संतप्त झाला. यावेळी काहींनी मतदान केंद्रात घुसून निवडणूक कर्मचाऱ्यांना दमदाटी केली. इतकंच नाही, तर बूथ क्रमांक ४० आणि ४१ मध्ये घुसून ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशीन उचलून नेले आणि जवळच असलेल्या तलावात फेकून दिले. या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here