नगर : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) मोठी दुर्घटना घडल्याचे समोर आला आहे. मालगाडीने कंचनजंगा एक्सप्रेसला (Kanchenjunga Express) धडक दिल्याने रेल्वेचा मोठा अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास न्यू जलपाईगुडी येथे ही घटना घडली. दरम्यान, मालगाडीने धडक दिल्यानंतर कंचनजंगा एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरले होते.
नक्की वाचा : ‘नेत्याला पक्षात घेऊन संपवणं ही भाजपची परंपरा’- विजय वडेट्टीवार
नेमकं काय घडलं ? (Kanchenjunga Express Accident)
मिळालेल्या माहितीनुसार, ही मालगाडी अगरतलावरून सियालदाह येथे जात होती. यावेळी या मालगाडीने न्यू जलपाईगुडी येथे रुळावर उभ्या असलेल्या कंचनजंगा एक्सप्रेसला जोरदार धडक दिली. ही धडकी इतकी जोरदार होती, की यावेळी कंचनजंगा एक्सप्रेसचे काही डबे थेट रुळावरून खाली घसरले. या अपघातात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून, अनेक प्रवासी जखमी आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला आहे.
अवश्य वाचा : चंदू चॅम्पियन’मध्ये मराठमोळ्या श्रेयस तळपदेची वर्णी!
ममता बॅनर्जीं यांनी दिली माहिती (Kanchenjunga Express Accident)
सध्या घटनास्थळी मदत आणि बचाव पथकांनी धाव घेतली आहे. बचाव पथक, वैद्यकीय मदतीसाठी डॉक्टरांची टीम, रुग्णवाहिका, पोलीस आणि आपत्ती पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. युद्धपातळीवर कारवाई सुरू केली आहे, असं ट्विट ममता बॅनर्जी यांनी केलं आहे.
या अपघातानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. न्यू जलपाईगुडी येथे झालेला अपघात दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. याबरोबरच या ठिकाणी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे. तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकारीही या ठिकाणी पोहोचले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.