What Is AB Form: निवडणुकीत उमेदवारांना दिला जाणारा AB फॉर्म म्हणजे नक्की काय?

0
What Is AB Form: निवडणुकीत उमेदवारांना दिला जाणारा AB फॉर्म म्हणजे नक्की काय?
What Is AB Form: निवडणुकीत उमेदवारांना दिला जाणारा AB फॉर्म म्हणजे नक्की काय?

What Is AB Form: राज्यात आता महापालिका निवडणुकांसाठी (Municipal Elections) राजकीय वातावरण तापलं आहे. 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान (Voting)होईल तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. मात्र या निवडणुकीच्या काळात तुम्ही सतत एक शब्द ऐकला असेल तो म्हणजे AB फॉर्म. उमेदवारी अर्ज, चिन्ह वाटप आणि अधिकृत उमेदवार ठरवण्यामध्ये या फॉर्मची भूमिका अत्यंत निर्णायक असते. पण हा एबी फॉर्म (AB Form) म्हणजे नेमकं काय?,या फॉर्ममध्ये नेमकं काय असतं?, या एबी फॉर्मला निवडणुकीत इतकं महत्व का असतं? हेच आज आपण पाहणार आहोत…

नक्की वाचा:  २०२५ मधील व्हायरल घटना कोणत्या? जाणून घ्या सविस्तर…   

AB फॉर्म म्हणजे नेमकं काय ? (What Is AB Form)

AB फॉर्म हा राजकीय पक्षाकडून निवडणूक आयोगाला दिला जाणारा एक अधिकृत दस्तऐवज आहे. या फॉर्मद्वारे संबंधित पक्ष आपला अधिकृत उमेदवार कोण आहे, हे निवडणूक अधिकाऱ्यांना कळवतो. कोणत्याही पक्षाच्या वतीने निवडणूक लढवायची असल्यास हा फॉर्म अत्यावश्यक असतो. एखाद्या मतदारसंघातून एकाच पक्षाकडून अनेक इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करू शकतात.

अशा परिस्थितीत AB फॉर्म ज्याच्याकडे आहे, तोच त्या पक्षाचा अधिकृत उमेदवार मानला जातो. या फॉर्मच्या आधारेच उमेदवाराला पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह दिले जाते. यातील ए फॉर्म’ हा त्या पक्षाची मान्यता आणि चिन्ह यासाठीचा अधिकृत दस्तऐवज मानला जातो. यावर पक्षाने तिकीट वाटपासाठी अधिकृत केलेल्या व्यक्तीची स्वाक्षरी असते.तर ‘बी फॉर्म’ हा अधिकृत उमेदवारा संदर्भातील दस्तावेज आहे.

अवश्य वाचा: हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड   

AB फॉर्ममध्ये कोणती माहिती असते? (What Is AB Form)

या फॉर्ममध्ये राजकीय पक्षाचे नाव, अधिकृत उमेदवाराचे नाव, संबंधित मतदारसंघ, तसेच पक्षाच्या अधिकृत पदाधिकाऱ्याची सही असते. ही सही पक्षाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष किंवा निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत अधिकृत व्यक्तीची असणे आवश्यक असते. जर उमेदवाराकडे AB फॉर्म नसेल, तर तो उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवतो. अशा उमेदवाराला पक्षाचे चिन्ह, अधिकृत प्रचार आणि पक्षाचा अधिकृत पाठिंबा मिळत नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर, AB फॉर्म हा उमेदवार आणि राजकीय पक्ष यांच्यातील अधिकृत नात्याचा पुरावा आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि शिस्त राखण्यासाठी या फॉर्मचे महत्त्व अत्यंत मोठे आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराला हा फॉर्म भरून द्यावा लागतो.