नगर : सध्या गुइलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) या नवीन आजाराने देशात डोकं वर काढलं आहे. पुणे (Pune) जिल्ह्यात आतापर्यंत १२७ हुन अधिक रुग्ण (Patitent) या आजाराचे आढळून आलेत. इतर राज्यांमध्येही या आजाराचे संशयित रुग्ण दिसू लागलेत,अशा परिस्थितीत केंद्र सरकार सतर्क झाले आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे या आजाराचे कारण अजून कळू शकलेले नाही आणि यावर अजून ठोस उपचारही उपलब्ध नाहीत.
नक्की वाचा : हार्दिक शुभेच्छा…पण त्याचं काय? चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित
गुइलेन बॅरी सिंड्रोम (GBS) म्हणजे काय?(Guillain Barre Syndrome)

गुइलेन बॅरी सिंड्रोम म्हणजे जीबीएस हा एक प्रकारचा ऑटोइम्यून न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. या आजाराची लागण झाल्यावर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्याच नसांवर हल्ला करते. त्यामुळे रुग्णांना उठणे, बसणे, चालणे यात त्रास सहन करावा लागतो. तसेच, काही परिस्थितींमध्ये लोकांना श्वास घेणे कठीण होते. या आजाराने ग्रस्त व्यक्तीला अर्धांगवायू देखील होऊ शकतो. वास्तविक पाहता,आपली मज्जासंस्था दोन भागांमध्ये असते. पहिल्या भागाला मध्यवर्ती मज्जासंस्था म्हणतात तर दुसरा भाग परिधीय मज्जासंस्था आहे. गुइलेन बॅरी सिंड्रोममध्ये रोगप्रतिकारक यंत्रणा मज्जासंस्थेच्या दुसऱ्या भागावर म्हणजेच परिधीय मज्जासंस्थेवर हल्ला करते.
अवश्य वाचा : कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेवरील सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कसा होतो ?
आधीच विषाणूजन्य संसर्गाने ग्रस्त असलेले रुग्ण या सिंड्रोमचे सहज बळी ठरू शकतात. अशा स्थितीत खोकला, सर्दी, ताप, जुलाब, कोणतीही लस आणि शस्त्रक्रिया यामुळे शरीरात हा सिंड्रोम पसरू शकतो.
लक्षणे :
जिबीएस या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला हात आणि पायाला मुंग्या येतात आणि अशक्तपणा जाणवू लागतो.ही लक्षणे वेगाने पसरतात आणि पक्षाघातात बदलतात.रुग्णाला चालण्यात अशक्तपणा, पायऱ्या चढण्यात अडचण येते. बोलण्यात, चघळण्यात किंवा गिळण्यात अडचण येऊ शकते. या आजाराच्या लक्षणांमध्ये डोळे हलवण्यास त्रास होणे, शरीरात तीव्र वेदना, लघवी आणि शौचाला त्रास होणे, तसेच श्वास घेण्यास त्रास होणे यांचा समावेश होतो. याशिवाय रक्तदाब झपाट्याने घसरतो. त्यामुळे सेप्टिक अटॅक सारखी परिस्थितीही उद्भवू शकते आणि रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.
काय काळजी घ्यावी? (Guillain Barre Syndrome)
पाणी उकळून व गाळून प्यावे.
उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे.
दुग्धजन्य पदार्थ साठवून ठेवणे टाळावे आणि त्याचे ताजे असतानाच सेवन करावे
अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळच्या शासकीय रुग्णालयात जावे.