What is next for NCP:आता राष्ट्रवादीचा दादा कोण?राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार?

0
What is next for NCP: आता राष्ट्रवादीचा दादा कोण? राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार?
What is next for NCP: आता राष्ट्रवादीचा दादा कोण? राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार?

What is next for NCP: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Death) यांच्या चितेची राखही शांत झालेली नाही तोच अजित पवारांचा उत्तराधिकारी (Successor) कोण ठरणार,यासंदर्भातील चर्चांना उधाण आले आहे. अजित पवारांच्या निधनानंतर आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अजित पवार यांची जागा भरून काढणे आव्हानात्मक असले तरी, आता त्यांचा पक्ष आणि कुटुंबातून काही महत्त्वाची नावे समोर येत आहेत. त्यातूनच एक त्यांचा उत्तराधिकारी (What is next for NCP)असेल असंही बोललं जात आहे. ती नावे नेमकी कोणती आहेत. ते पाहुयात…

नक्की वाचा: अजित पवारांच्या निधनामुळे ‘झेडपी’ निवडणुका पुढे जाणार का? निवडणूक आयोग काय म्हणाले?  
१. सुनेत्रा पवार (पत्नी व राज्यसभा खासदार)

अजित पवारांची जबाबदारी पेलण्यासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. मंत्री नरहरी झिरवळ आणि राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री करण्याची खुली मागणी केली आहे. त्या सध्या राज्यसभा खासदार आहेत. माहितीनुसार, त्या राजीनामा देऊन बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवू शकतात आणि त्यांच्या जागी पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते. तसेच कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल मोठी सहानुभूती आहे आणि पवार कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी त्या एक ‘स्वीकार्य’ चेहरा ठरू शकतात.तसेच बारामतीमध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यामुळे त्यांना पक्ष संघटनांसाठी हि गोष्ट महत्वाची ठरू शकते.

२. पार्थ पवार

पार्थ पवार हे अजित पवार यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. त्यांना राजकीय अनुभवही आहे. त्यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक मावळ मतदारसंघातून लढवली होती, मात्र त्यांचा त्यांचा पराभव झाला होता. असं असलं तरी अजित पवारांच्या समर्थकांना त्यांचा वारसा त्यांच्या रक्ताच्या वंशानेच म्हणजेच त्यांच्या मुलानेच पुढे नेण्याची इच्छा आहे. परंतु पवारांच्या मुलांना असणारा राजकीय अनुभवाचा अभाव त्यांना अडथळा ठरू शकतो. दुसरीकडे, पार्थ पवार हे अलिकडेच पुण्यातील एका जमिनीच्या व्यवहारावरून वादात अडकले होते, त्यामुळे ही जबाबदारी त्यांच्यासाठी नकारात्मक मुद्दा ठरू शकते.

३.जय पवार

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार यांनाही संभाव्य उत्तराधिकारी म्हणून मानले जात आहे. जरी ते सध्या पडद्यामागे काम करत असले तरी, तरुण नेतृत्वाला बढती मिळाल्यास ते संभाव्य उमेदवार असू शकतात, अशी देखील एक चर्चा आहे.  

अवश्य वाचा:  राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार अनंतात विलीन,बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार  

४.सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीचे नेतृत्व करण्याच्या शर्यतीत महत्त्वाचे नाव येते ते म्हणजे सुप्रिया सुळे. शरद पवारांच्या कन्या आणि संसदेतील प्रभावी कामगिरीमुळे सुप्रिया सुळे या राष्ट्रीय पातळीवर पक्षाचा चेहरा बनल्या आहेत. अजित पवारांनंतर जर राष्ट्रवादीच्या मूळ विचारधारेला आणि संघटनेला एकत्र बांधून ठेवायचे असेल, तर सुप्रिया सुळे यांच्याकडे नेतृत्व सोपवणे हा सर्वात सुलभ मार्ग दिसतो. त्यांच्याकडे असलेला संयम, संवाद कौशल्य आणि महिला कार्यकर्त्यांचे मोठे जाळे ही त्यांची जमेची बाजू आहे. मात्र, सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व हे प्रामुख्याने वैचारिक आणि संघटनात्मक पातळीवर जास्त प्रभावी ठरते, तर दुसरीकडे अजित पवारांची ओळख ही ‘कामाचा माणूस’ आणि प्रशासनावर पकड असलेला नेता अशी आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे या अजित पवारांनंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढू शकतील का हा देखील प्रश्न आहे.

 ५. शरद पवार

आता या सगळ्या प्रक्रियेत सगळ्यात महत्वाचा पर्याय ठरतो तो म्हणजे शरद पवार. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात आजही आदर असणारे हे नाव आहे. वयाची मर्यादा असली तरी दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आणायची ताकद देखील फक्त शरद पवार यांच्या शब्दात असून शकते.  

कुटुंबाच्या बाहेरील अनुभवी नेते

६.प्रफुल पटेल

प्रफुल्ल पटेल हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वात अनुभवी व्यक्ती आहेत. अजित पवार यांनी जेव्हा राष्ट्रवादीसोबत बंड  केलं होता, तेव्हा या  बंडाच्या वेळी पटेल हे त्यांचे प्रमुख रणनीतीकार होते.राष्ट्रवादीच्या संघटनेवरही त्यांचे चांगले नियंत्रण आहे. त्यामुळे प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीसाठी एक चांगला पर्याय असू शकतात. ते महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं व्यक्तिमत्व आहेत. मात्र बारामतीतील जनता त्यांना स्वीकारेल की नाही हा एक मोठा प्रश्न आहे.

७. छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक प्रमुख ओबीसी नेते आहेत. अजितदादांचे संभाव्य उत्तराधिकारी म्हणून त्यांचे नाव चर्चेत आहे.  तसंच भुजबळ ओबीसींचे बलाढ्य नेते आहेत. बऱ्याच काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय देखील आहेत आणि त्यांना राज्याच्या राजकीय परिस्थितीची चांगली माहिती आहे. मात्र वय आणि जुने वाद पाहता त्यांच्यासाठी देखील  अडथळे निर्माण होऊ शकतात.तसेच भुजबळ यांना संधी दिल्यास मराठा समाज दुरावण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

८.सुनील तटकरे

सुनील तटकरे हे अजित पवारांच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक मानले जातात. ते रायगड मतदारसंघातून लोकसभा खासदार आहेत.तटकरेंनी महाराष्ट्रात संघटना बांधणीवर काम केलं आहे.तसंच जिल्हा स्तरीय केडरही त्यांच्यासोबत आहे.तटकरे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे  महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांनी राज्य सरकारमध्ये अर्थ, ऊर्जा आणि जलसंपदा यासह अनेक महत्त्वाची मंत्रीपदे भूषवली आहेत. राजकारणाचा मोठा अनुभव असल्याने त्यांना एक प्रभावशाली नेता मानले जातं. त्यामुळे त्यांचेही नाव चर्चेत आहे.
अश्या सगळ्या नावांच्या शक्यता वर्तविल्या जात आहेत.