नगर : दैनंदिन जीवनातन आपल्या सगळ्यांचा व्हॉट्सॲपचा (WhatsApp) वापर वाढला आहे. कामाच्या ठिकाणी देखील व्हॉट्सॲपचा मोठा वापर होत आहे. आता व्हॉट्सॲप वापरणं आणखी सोपं होणार आहे. मेटा कंपनी युजर्ससाठी नवीन फिचर आणण्याच्या तयारीत आहे. व्हॉट्सॲप लॉगिनसाठी ईमेलचा (WhatsApp Email Login Feature) वापर करण्यासाठी फिचर बनवत आहे.
नक्की वाचा : आयसीसीचा नवा नियम ; गोलंदाजांनाही ‘टाईमआउट’
व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्ससाठी त्यांच्या अकाऊंटवर लॉगिन करण्याचा आणखी एक पद्धत उपलब्ध केली आहे. या नवीन पद्धतीमध्ये युजर्सना ईमेलच्या मदतीने त्यांच्या अकाऊंटमध्ये लॉगिन करता येईल. सध्या हे फिचर फक्त आयफोन युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आलं आहे. मात्र लवकरच हे फिचर अँड्रॉइट युजर्ससाठीही उपलब्ध करण्यात येईल. आयफोन युजर्सला एसएमएसद्वारे लॉगिन करण्यात कोणतीही समस्या येत असेल तर त्याला ईमेलद्वारे लॉगिन करता येणार आहे.
हेही वाचा : राज्यात आणखी ‘२०’ हजार शिक्षकांची भरती होणार
हे फीचर तपासण्यासाठी युजर्सना सेटिंगमध्ये जावं लागेल, त्यानंतर अकाउंट्समध्ये जावं लागेल. ईमेल लॉगिन फिचर तात्पुरतं देण्यात आहे. युजर्सना SMS वर ओटीपी मिळवण्यात समस्या येत असल्याच्या तक्रारी मिळाल्याने कंपनीने ही तात्पुरती सुविधा उपलब्ध केल्याचं सांगितलं जात आहे.