WhatsApp Upadate : सुरक्षेसाठी व्हॉट्सॲपचं नवं फिचर येणार

व्हॉट्सॲप आता वापरकर्त्यांच्या  प्रायव्हसी फिचरवर काम करत आहे. या नवीन फिचरमुळे व्हॉट्सॲप वापरताना तुमची सुरक्षितता वाढेल.

0
सुरक्षेसाठी व्हॉट्सॲपचं नवं फिचर येणार

नगर : व्हॉट्सॲप (WhatsApp) नेहमीच वापरकर्त्यांसाठी काही ना काही नवीन फिचर (New Feature) आणत असते. असाच एक नवीन प्रयोग करत व्हॉट्सॲप आता वापरकर्त्यांच्या प्रायव्हसी फिचरवर (Privacy feature) काम करत आहे. या नवीन फिचरमुळे व्हॉट्सॲप वापरताना तुमची सुरक्षितता वाढेल. या फीचरमुळे तुम्ही कोणत्याही व्यक्तीसोबच तुमचा मोबाईल नंबर न देता चॅट करू शकता. व्हॉट्सॲपचे हे फीचर तुम्हाला गोपनीयता (confidentiality) राखण्यासाठीही मोठी मदत करणार आहे.

नक्की वाचा : अखेर भिडेवाडा झाला इतिहासजमा ;महापालिकेकडून कारवाई 

जगभरात व्हॉट्सॲपचे एक अब्जाहून अधिक युजर्स आहेत. त्यामुळे आता कंपनी प्रायव्हसी आणि कनेक्टिव्हिटीसंदर्भात एक नवीन फीचर आणणार आहे. यामुळे युजर्सला चॅट करण्यासाठी कुणासोबतही मोबाईल नंबर शेअर करण्याची गरज पडणार नाही. नंबर शेअर न करता तुम्हाला व्हॉट्सॲपवर चॅट करता येणार आहे. या फिचरचा वापर करुन युजर्सना फोन नंबर शेअर करण्याऐवजी यूजरनेम वापरून संबंधित व्यक्ती किंवा इतरांशी कनेक्ट करण्याची परवानगी मिळेल.

हेही वाचा :  शाहरुख खानच्या ‘डंकी’चा ट्रेलर प्रदर्शित;’या’ दिवशी येणार सिनेमा   

व्हॉट्सॲप सध्या ‘यूजरनेम’ या नवीन फीचरवर काम करत आहे. यासोबतच यूजर्सच्या प्लॅटफॉर्मवर एक नवीन सर्च बार देखील उपलब्ध असणार आहे. ज्याद्वारे लोक मोबाईल नंबरशिवाय त्यांच्या यूजरनेमद्वारे इतर व्यक्तींना  शोधण्यास सक्षम असतील. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की लोकांना लवकरच व्हॉट्सॲपवर नवीन युजरनेम आयडी मिळेल.

युजरनेम फिचर सुरु झाल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर कोणालाही शेअर करण्याची गरज भासणार नाही, हा सर्वात मोठा फायदा असेल. या फिचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरची एक्सचेंज न करता कोणाशीही सहज संपर्क साधू शकता. लवकरच  व्हॉट्सॲप हे फिचर  लाँच करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here