MahaKumbhMela : तब्बल १२ वर्षातून एकदा होणाऱ्या महा कुंभमेळ्याची (Mahakumbhmela)भारतातीलच नव्हे तर विदेशातीलही भाविक मोठ्या आतुरतेनं वाट पाहत असतात. या कुंभमेळाव्यात विविध साधू,तपस्वी पाहायला मिळतात. कोट्यवधी भाविक या कुंभमेळ्याला हजेरी लावत असतात. यंदाचा कुंभमेळा हा उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) पार पडणार आहे.
नक्की वाचा : मुरलीधर मोहोळ मुख्यमंत्री होणार ? चर्चेला उधाण
१२ वर्षांपूर्वी प्रयागराज जिल्हा व्यवस्थापनाकडून या महा कुंभमेळ्याची व्यवस्था करण्यात आली होती. पण यावेळी मात्र या कुंभ मेळ्यासाठी स्वतंत्र जिल्ह्याचीच घोषणा करण्यात आली आहे. या जिल्ह्याचं नावदेखील ‘महा कुंभ मेळा’ असं करण्यात आलं आहे. या जिल्ह्याचं व्यवस्थापन कुंभमेळा व्यवस्थापन पदाधिकाऱ्यांकडूनच केलं जाणार आहे.१२ वर्षांपूर्वी झालेल्या मेळाव्याला काही कोटी भाविकांनी हजेरी लावली होती. यावेळी ही संख्या तब्बल १० कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत असून या काळात सुरक्षा व्यवस्थेसाठीही चोख बंदोबस्ताच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून पावलं उचलली जात आहेत.
अवश्य वाचा : ‘शरद पवारांना भीती आहे की आपला पक्ष अर्धा होईल’- चंद्रशेखर बावनकुळे
कधी होणार महा कुंभमेळा? (Maha Kumbh Mela 2025)
२०२५ या नवीन वर्षाच्या फेब्रुवारी व मार्च महिन्यात यंदाचा महा कुंभमेळा होणार आहे. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी असा ४४ दिवस महा कुंभमेळा चालणार आहे. यासाठी नव्याने तयार करण्यात आलेला महा कुंभमेळा जिल्हा जवळपास ६ हेक्टर परिसरामध्ये उभारण्यात येत आहे. त्यातील ४ हजार हेक्टरमध्ये प्रत्यक्ष कुंभ मेळ्याचं आयोजन होईल, तर १९०० हेक्टर परिसरामध्ये वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था केली जाईल,असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
कुंभमेळाव्यात सुरक्षेची चोख उपाययोजना (Maha Kumbh Mela 2025)
महा कुंभमेळाव्यात शाही स्नानाला मोठं महत्त्व असल्याचं मानलं जातं. त्यामुळे या काळात गंगा नदीवर लाखोंच्या संख्येनं भाविक शाही स्नान करतात. अशावेळी कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी पोलिसांसोबतच अंडरवॉटर ड्रोनचीही व्यवस्था करण्यात आली आहे. हे ड्रोन ३०० मीटरपर्यंतच्या खोलीवरचा माग काढू शकतात.