Monalisa Mahakumbh : कुंभमेळा (Kumbhmela 2025) यंदा उत्तरप्रदेशमधील प्रयागराजमध्ये होत आहे. १३ जानेवारीपासून सुरू झालेल्या या महाकुंभात वेगवेगळे साधू पाहायला मिळत आहे. मात्र साधूंपेक्षा सौंदर्यवतींची अधिक चर्चा या महाकुंभात होताना दिसत आहे. सगळ्यांना मागे टाकत एका घाऱ्या रंगाचे डोळे असलेल्या मुलीने सगळ्यांनाच वेड लावले आहे. मध्य प्रदेशातील या मुलीने तिच्या नैसर्गिक सौंदर्याने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. महाकुंभमेळ्यात माळा विकणाऱ्या या मुलीचे नाव मोनालिसा भोसले (Monalisa Bhosle) आहे. विशेष बाब म्हणजे या मोनालिसाचा पहिला फोटो (First Photo) नगरमधील अपर्णा फुलसौंदर या तरुणीने काढला आहे.
नक्की वाचा : मोठी बातमी!यूपीएससी परीक्षेची जाहिरात निघाली
मोनालिसा नेमकी कोण ? (Monalisa Mahakumbh)
महाकुंभमेळ्यात रुद्राक्षाचे मणी विकणारी मोनालिसा ही मुळची मध्यप्रदेशातील इंदोरमधील माहेश्वरी परिसरातील एका गरीब कुटुंबातील मुलगी आहे. आपल्या कुटुंबासह जवळपास ५० जणांसोबत ती महाकुंभमेळ्यात क्रिस्टल, रुद्राक्ष आणि कंठी माळा विकत होती. गेल्या आठवड्यात महाकुंभाला आलेल्या काही युट्यूबर्सनी तिच्याशी संवाद साधला आणि त्यानंतर तिचा व्हिडीओ देशभरात व्हायरल झाला.मोनालिसाचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर वाऱ्यासारखे पसरले आणि रातोरात ती प्रसिद्धी झोतात आली.
अवश्य वाचा : …’त्या’ वक्तव्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले स्पष्टीकरण
काजळ लावलेले घारे डोळे,लांबसडक केस, सावळा रंग, टोकदार नाक आणि गोड बोलणं असलेली असलेली मोनालिसा सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर लोक मोनालिसाची तुलना बॉलीवूडच्या सुंदरी ऐश्वर्या रायसोबत करताना दिसून आलेत. मोनालिसा ही विविध धार्मिक स्थळांवर रुद्राक्ष आणि मोत्यांचे मणी विकते.महाकुंभ मेळ्यात तिच्याकडे मीडियाचे कॅमेरे वळाले आणि रातोरात ती प्रसिद्धी झोतात आली. त्यामुळे तिचे फॉलोअर्स देखील वाढले आहेत. मोनालिसाच्या मागे वृद्धांपासून तरुणांपर्यंत तिच्याबरोबर फोटो काढण्यासाठी गर्दी झाली होती. मात्र प्रसिद्धीझोतात आल्यामुळे मोनालिसाला याच त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे तिने महाकुंभ सोडल्याची चर्चा आहे.
प्रसिद्धीचा मोनालिसाला फटका (Monalisa Mahakumbh)
महाकुंभमधून काही लोकांनी तिला उचलून नेण्याची धमकीही दिली होती,असं तिने सांगितलं आहे. प्रयागराज सोडण्यापूर्वी तिने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही आवाहन केलं होतं. पण या आवाहनाचा काहीही उपयोग झाला नसल्याचे दिसून आले. महाकुंभ मध्ये तिच्या कुटुंबाने लाखो रुपयांच्या वस्तू विक्रीसाठी आणल्या आहेत. मात्र तिच्याभोवती असलेल्या गराड्यामुळे तिला या वस्तू विकण्यात अडचणी येत असल्याचे तिने सांगितले. महाकुंभ सोडल्याची चर्चा असतानाच मोनालिसाचा मेकअप करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यामुळे पुन्हा एकदा तिची चर्चा रंगली आहे..