Murlidhar Mohol:मुरलीधर मोहोळ मुख्यमंत्री होणार?चर्चेला उधाण

0
Murlidhar Mohol:मुरलीधर मोहोळ मुख्यमंत्री होणार?चर्चेला उधाण
Murlidhar Mohol:मुरलीधर मोहोळ मुख्यमंत्री होणार?चर्चेला उधाण

Murlidhar Mohol : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय केंद्रीय नेतृत्वावर सोपवून आता तीन दिवस झाले आहेत. मात्र तरीही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार? यावर निर्णय झाला नाही. त्यातच आता पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांची मुख्यमंत्रीपदासाठीची (CM) चर्चा सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे. या चर्चेवर आता मुरलीधर मोहोळ यांनी स्वतःच उत्तर दिले आहे.

नक्की वाचा : ‘भाजपचे सरकार आल्याने अण्णा हजारे आजारी,त्यामुळे ते आंदोलन करत नाहीत’-रोहित पवार  

काय म्हणाले मुरलीधर मोहोळ? (Murlidhar Mohol)

राज्यातील परिस्थिती देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अनुकूल असतानाही मुख्यमंत्रीपदाचा निर्णय जाहीर करण्यात उशीर होत असल्यामुळे आता विविध नावे समोर आले आहेत. यातच पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चेवर आता मुरलीधर मोहोळ यांनीच स्वतःहून भूमिका व्यक्त केली. ते म्हणाले, “समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निरर्थक आणि कपोलकल्पित आहे.”

अवश्य वाचा : अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरावर ईडीचा छापा  

“आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आहे. आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो.असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर ! आणि संसदीय मंडळात एकदा का निर्णय झाला, तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे”, असेही मुरलीधर मोहोळ म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here