नगर :दुबई एअर शोमध्ये (Dubai Air Show) शुक्रवारी (ता.२१) भारतीय बनावटीच्या विमानाच्या हवाई कसरती सुरू असताना तेजस लढाऊ विमानाचा अपघात(Tejas fighter jet accident) झाला आहे. या अपघातात ला लढाऊ विमानाचे विंग कमांडर नमांश सियाल (Namansh Syal) हे शहीद झाले. या बातमीनंतर हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यातील नगरोटा बागवान गावावर मोठी शोककळा पसरली. शुक्रवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी २ वाजून १० मिनिटांनी तेजस विमान कोसळले आहे.
नक्की वाचा: लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर आता मोठी कारवाई
विंग कमांडर सियाल नेमके कोण ? (Wing Commander Namansh Syal)

माहितीनुसार,विंग कमांडर सियाल हे त्यांच्या शिस्त आणि नम्रतेसाठी ओळखले जात होते. त्यांचे शालेय शिक्षण हमीरपूर जिल्ह्यातील सैनिकी शाळेत झाले. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, भारतीय हवाई दलात अधिकारी असलेल्या पत्नी आणि सहा वर्षांची मुलगी असा परिवार आहे. नमांश सियाल यांचे वडील जगन नाथ सैन्य दलातून निवृत्त झाले आहेत. आई बिना देवी या अपघातावेळी हैदराबाद येथे मुलगा आणि सून यांना भेटायला गेल्या होत्या. नमांश यांच्या पत्नी अफसान यादेखील हवाई दलात अधिकारी आहेत.
अवश्य वाचा: थंडीच्या काळात तुमच्या आरोग्याची काळजी कशी घ्याल? जाणून घ्या महत्वाच्या टिप्स
नमांश सयाल यांच्या दुर्दैवी मृत्यूने देशावर शोककळा (Wing Commander Namansh Syal)
नमांश सियाल यांचे मेहुणे रमेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार,तो फक्त ३४ वर्षांचा होता. त्यांना लवकरच बढती मिळणार होती. तो आता स्वॉड्रन लीडरच्या पदावर पोहोचला होता. तो खूप नम्र व्यक्ती होता. त्याच्या जाण्याने संपूर्ण गावाला धक्का बसला आहे. नमांश सयाल यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त होत आहे. हिमाचल प्रदेशचे नेते आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही एक्सवर पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केले.



