
नगर : राज्यात पुण्यातील स्वारगेट अत्याचार (Swargate Rape Case) प्रकरण ताजे असतानाच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) पुन्हा एक धक्कादायक घटना घडली आहे. शरीरसुखाची मागणी केल्यानंतर महिलेने नकार दिल्याने एका १९ वर्षीय तरूणाने भावकीतीलच ३६ वर्षांच्या महिलेवर सपासप वार (Attack on woman) करून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या महिलेला तब्बल २८० टाके पडले आहेत. एका खासगी रुग्णालयात ही महिला मृत्यूशी झुंज देत असल्याची माहिती समोर आली आहे.
नक्की वाचा : स्वारगेट अत्याचार प्रकरण;आरोपी दत्ता गाडेचा पोलिसांच्या गणवेशातील फोटो आला समोर
पीडिता काय म्हणाली?(Chhatrapati Sambhajinagar Crime)

याबद्दल बोलताना पिडीत महिलेने सांगितलं की,माझ्यावर त्याने एवढे वार केलेत की, डॉक्टरला गोधडीवानी माझं अंग शिवावं लागलंय.हे टाके शिवण्यासाठी दोराच २२ हजार रुपयांचा लागला आहे. एकही अवयव असा नाहीये की,जिथे फाडलेलं नाही. त्या घावांमुळे अंगावर आगडोंब उठला आहे. सहन होत नाही, पण रडताही येत नाही. कारण,डोळ्यातून आलेलं पाणी टाके शिवलेल्या जखमेला लागलं तर आणखीच आग उठते.आता मी करू तरी काय असं ती म्हणाली आहे.
अवश्य वाचा : धनंजय मुंडे यांना क्लीनचिट देणाऱ्या नामदेव शास्त्रींची भावना बदलली
नेमकं काय घडलं ? (Chhatrapati Sambhajinagar Crime)
ती महिला पुढे म्हणाली की, यामध्ये माझी काहीच चूक नव्हती. रविवारी (ता.२) दुपारी मी शेतात काम करत असताना अभिषेकचा मला फोन आला. तो फोनवर म्हणाला की, एक तर तू माझ्याबरोबर झोप, नाही तर तुझ्या जावेशी माझे जुळवून दे. मी असं कसं ऐकून घेणार, मला राग आला आणि मी त्याचा फोन कट केला. संध्याकाळी मी शेतातलं काम संपवून रस्त्याने जात असताना अचानक पाठीमागून येऊन त्याने मला काही समजायच्या आतच त्यानं पहिल्यांदा कटरनं चेहऱ्यावर वार केला. तसेच दोन दगडाचा वार देखील या महिलेवर करण्यात आला. २८० टाके घालण्यासाठी दोऱ्याचाच खर्च २२ हजार रूपये आला आहे.
पीडित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा अतिरिक्त रक्तस्राव झाल्याने आतापर्यंत त्यांना ५ बाटल्या रक्त शरीरात चढवण्यात आलं आहे. हा सगळा प्रकार घडल्यानंतर आरोपी अभिषेक तात्याराव नवपुते (वय १९, रा.घारदोन) या घटनेनंतर संपूर्ण गावात काही घडलेच नाही अशा स्थितीत फिरत होता. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्ताप दिसला नाही. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी त्याला सुनावण्यात आली आहे.