Women Power : स्त्री शक्तीने सामाजिक परिवर्तन घडणार : शीला शिंदे 

Women Power : स्त्री शक्तीने सामाजिक परिवर्तन घडणार : शीला शिंदे 

0
Women Power : स्त्री शक्तीने सामाजिक परिवर्तन घडणार : शीला शिंदे 
Women Power : स्त्री शक्तीने सामाजिक परिवर्तन घडणार : शीला शिंदे 

Women Power : नगर : महिलांनी राजमाता जिजाऊंच्या (Rajmata Jijau) संस्काराने भावी पिढी घडविण्याचा संकल्प करावा. स्त्री शक्तीने (Women Power) सामाजिक परिवर्तन घडणार आहे. मुली व महिलांवरील अत्याचार करणाऱ्या नराधमांना रोखण्यासाठी आजही छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj)छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) संस्काराप्रमाणे मुलांना घडविले पाहिजे. यासाठी प्रत्येक महिलेला जिजाऊंची भूमिका घ्यावी लागणार असल्याचे प्रतिपादन माजी महापौर शीला शिंदे यांनी केले.

नक्की वाचा : महिला ग्रामसभेत दारू दुकान गावाबाहेर घेऊन जाण्याचा निर्णय

माजी महापौर शीला शिंदे यांच्याकडून सर्व महिलांचा सन्मान

रेल्वे स्टेशन रोड येथील आगरकर मळा येथे महिला दिनानिमित्त शिवसेनेच्यावतीने माजी महापौर शीला शिंदे यांनी सर्व महिलांचा सन्मान केला. तर परिसरातील महिलांसह अबालवृद्धांना नुकताच प्रदर्शित झालेला छावा सिनेमा दाखविण्यात आला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी ॲड. अनुराधा येवले, संपूर्णा सावंत, रेखा विधाते, रेखा पगारिया, रिटा गोरे, राधा ग्यानप्पा, उषा नामदे, रेखा घोडेकर, सोनाली मुनोत, जया खताळ, पूजा बनभेरू, मीना बनभेरू, स्नेहा खताळ, वैशाली पोळ आदींसह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

अवश्य वाचा : शिव्या बंदीच्या शासन निर्णयासाठी सरपंच आरगडे यांचे उपोषण

महाराजांच्या संस्काराने मुले घडविण्याची अपेक्षा (Women Power)

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माणा साठी जीवन सर्मपण केले. तर संभाजी महाराजांनी धर्मासाठी मृत्यूला कवटाळले. हा धगधगता इतिहास आजच्या पिढीला ज्ञात होण्याची गरज आहे. शिवकालीन इतिहास हा आजच्या युवकांना प्रेरणा व स्फूर्ति देणार आहे. घराघरातून महाराजांच्या संस्काराने मुले घडविण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.