Women Safety : कर्जत : स्त्रियांना देवी म्हणून भिंतीच्या चौकटीत बसवणे बंद व्हायला हवे. आज अनेक महिला (Women) विविध क्षेत्रात काम करत आहे. स्त्री कमकुवत नाही तर त्या सक्षम आहेत. मुलींपासून महिलांपर्यंत सुरक्षिततेचा (Women Safety) प्रश्न अजूनही जिवंत आहे. रूढीवाद, लिंगभेद (Gender Discrimination) अजूनही समाजात पाळला जातो. त्यामुळे समाजामध्ये सकारात्मक बदलाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मीनाताई जगधने यांनी केले. कर्जत येथील तिसऱ्या स्त्री शिक्षिका साहित्य संमेलनात (Women Teacher Literary Conference) एकविसावे शतक आणि महिला सक्षमीकरण परिसंवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
नक्की वाचा : मोठी बातमी!संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक
मोठ्या संख्येने शिक्षिका उपस्थित होत्या
यावेळी बोलताना डॉ. कविता मुरूमकर म्हणाल्या, महिलांना डिजिटल साक्षरता व रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. स्त्रियाच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन शैक्षणिक धोरणात लवचिक अभ्यासक्रम व मातृभाषेला महत्त्व दिले गेले. कोणतीही मुलगी शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रयत्न व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. निशा भंडारे म्हणाल्या, आजची महिला शिक्षण घेऊनसुद्धा व्रत वैकल्यात अडकल्या आहेत. त्यांना बदलण्याचे काम स्त्री-शिक्षिकांनी केले पाहिजे. स्त्री गर्भातच सुरक्षित नाही तर समाजात कशी सुरक्षित राहील. विद्यार्थ्यांना आजचे ज्ञान गुगलवर पाहिजे असते. स्त्री पुरुष समानता असण्यासाठी तशी मानसिकता बदलायला हवी. महिला सबला आहे तिला अबला मानू नका, ती सक्षमच आहे. सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतीबा फुले यांचा विचार पुढे घेऊन गेल्या.
अवश्य वाचा : चीनमध्ये ह्युमन मेटापन्यूमो व्हायरसचा हाहाकार; भारताला धोका?
शेख नाजिया यांचे शैक्षणिक धोरणावर मनोगत (Women Safety)
शेख नाजिया यांनी नवीन शैक्षणिक धोरणावर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अंतिम चरणात विविध क्षेत्रात सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे चालविणाऱ्या स्त्री शिक्षिकांना व वैचारिक प्रबोधन करणाऱ्या स्त्री सुधारकांच्या नावे वेगवेगळे चौदा पुरस्कार संमेलनाध्यक्षा डॉ. वंदना महाजन, रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, बाळासाहेब साळुंके, सुभाषचंद्र तनपुरे, निर्मलाताई पाटील, मंगलताई पाटील, विमल माळी, प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या सत्राचे सूत्रसंवादक म्हणून अहिल्यानगर येथील डॉ. महेबूब सय्यद यांनी भूमिका पार पाडली.
यावेळी सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्य विषयक योगदान देणाऱ्या १४ महिलांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये राजमाता जिजाऊ पुरस्कार – डॉ. सुवर्णा नाईक निंबाळकर (पुणे), पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार- अनिताताई लक्ष्मण काळे पाटील (अहिल्यानगर), ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार- डॉ. कविता दत्तात्रय मुरुमकर (सोलापूर), लक्ष्मीबाई भाऊराव पाटील पुरस्कार- मीनाताई जगधने (श्रीरामपूर), फातेमा शेख पुरस्कार- शेख नाजिया अब्दुल रहेमान (श्रीरामपूर), ताराबाई शिंदे पुरस्कार- प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे (बेलापूर), रखमाबाई राऊत पुरस्कार- मेघना संजय झुझम (चंदगड-कोल्हापूर), मुक्ता साळवे पुरस्कार- डॉ. विद्या सुर्वे बोरसे (नाशिक), माता रमाई पुरस्कार- डॉ. निशा भंडारे (पुणे), दुर्गा भागवत पुरस्कार- मनीषा पाटील (कवठे महांकाळ-सांगली), नजूबाई गावित पुरस्कार- प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित (अहिल्यानगर), गेल ऑम्वेट पुरस्कार- सुवर्णा पवार (सांगली), बाया कर्वे पुरस्कार- प्रतिमा हेरंब कुलकर्णी (अकोले), भूमिकन्या पुरस्कार- मीरा देवळालीकर (कर्जत) यांना संमेलनात पुरस्काराने गौरविण्यात आले.