Women Safety : नगर : महिलांचे अधिकार (Women’s Rights), महिलांचे सर्व क्षेत्रात असेलेले योगदान, महिलांवर कामाच्या ठिकाणी सुरक्षितता (Women Safety), होणारे अत्याचार यावर महिलांनी जागृत असणे गरेजेचे आहे. आपले अधिकार व हक्क जोपासले तरच सुदृढ समाजाची निर्मिती होते, असे प्रतिपादन वरिष्ठ स्तर सह दिवाणी न्यायाधीश यु. टी. मुसळे (U. T. Musale) यांनी केले.
अवश्य वाचा : ‘त्या’ दोन्ही डॉक्टरांचा जामीन अर्ज मागे
कायदे विषयक जागृती शिबिर
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा अंजू शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि अहमदनगर बार आसोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला विधिज्ञ बार रूममध्ये कायदे विषयक जागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी वरिष्ठ स्तर सह दिवाणी न्यायाधीश यु. टी. मुसळे बोलत होत्या. यावेळी न्यायाधीश एम.डी.चऱ्हाटे, न्यायाधीश योगेश पैठणकर, ॲड. राजेश कातोरे, अध्यक्ष, ॲड. स्वाती पाटील, ॲड. निर्मला चौधरी आदी उपस्थित होत्या.
नक्की वाचा : सुनीता भांगरे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
न्यायाधीश चऱ्हाटे म्हणाल्या, (Women Safety)
महिलांना कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अत्याचारावर प्रतिबंध घालण्यासाठी ‘विशाखा’ ही अंतर्गत समिती स्थापन केलेली असते. या समितीच्या कामाबदल तसेच पोस्को, रॅगिंग प्रतिबंधक कायदा, माहिती-तंत्रज्ञान कायद्यातील महत्वाच्या तरतुदींची माहिती यावेळी देण्यात आली. ॲड. अनिता दिघे यांनी प्रस्ताविक केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. अहमदनगर महिला बार असोसिएशनच्या सचिव ॲड. ज्योती हेमणे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी सचिव योगेश पैठणकर यांनी आभार मानले.



