women’s conference : स्त्री चळवळीतील कार्यकर्त्या आणि स्त्रियांच्या संघटनांनी एकत्र येऊन महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषद मंच स्थापन केलीय.
नगरः संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय महिला वर्षाची घोषणा 1975ला केली होती. 2025 मध्ये या घोषणेला पन्नास वर्षे झाली आहेत. या पन्नास वर्षात स्त्रियांच्या जीवनात मोठे बदल झाले. स्त्रियांच्या चळवळीमुळे कायदे बदलले. सरकारी धोरण बदलली. या सर्व बदलाचा मागवा घेण्यासाठी तसेच पुढील काळातील स्त्रियांच्या चळवळीची दिशा ठरवण्यासाठी महाराष्ट्रातील स्त्री चळवळीतील कार्यकर्त्या आणि स्त्रियांच्या संघटनांनी एकत्र येऊन महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषद मंच स्थापन केला आहे . या मंचाच्या वतीने वर्षभर महाराष्ट्रात विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत.
अवश्य वाचा : अहिल्यानगर महापालिकेचा गलथान कारभार; सहा महिन्यांपासून रस्त्याचे काम रखडले
स्त्रीयांच्या प्रश्नांचा मागोवा घेण्यासाठी काम सुरू
अहिल्यानगर जिल्ह्यातील स्त्रीवादी कार्यकर्त्या आणि संघटनांनी एकत्र येऊन जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद या मंचा मार्फत स्त्री प्रश्नांचा मागोवा घेण्यासाठी काम सुरू केले आहे. गेल्या काही महिन्यात सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांमधील स्त्रियांसंबंधीच्या सुरक्षिततेचा अभ्यास जिल्ह्यातील स्त्री कार्यकर्त्यांनी केला.
नक्की वाचा : ओवैसींच्या सभेत महिला पदाधिकाऱ्याचा ‘जय भीम,जय शिवराय’चा नारा
जेष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या करणार मार्गदर्शन (women’s conference)
रविवारी 12 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील महिलांची परिषद (Women’s Conference) अहिल्यानगर जिल्हा स्त्रीमुक्ती परिषद आणि, ग्रामीण विकास अभ्यास केंद्र (सीएसआरडी) यांच्या विद्यमाने सीएसआरडी (CSRD) सभागृहात सकाळी दहा ते पाच या वेळामध्ये होत आहे. या परिषदेचे उद्घाटन सीएसआरडीचे प्राचार्य सुरेश पठारे यांच्या हस्ते होत आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या ॲड. निशा शिवूरकर (Adv. Nisha Shivurkar) या असणार आहेत.
दिवसभर चालणाऱ्या या परिषदेत गेल्या पन्नास वर्षातील स्त्री चळवळीचा आढावा ,महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषदेच्या विविध मोहिमा, पुढील कार्यक्रम ,भारतीय संविधाना समोरील आक्रमक राष्ट्रवादाचे आव्हान तसेच जिल्ह्यातील बेपत्ता झालेल्या मुलींचा प्रश्न, स्त्रियांवरील हिंसेचे विविध पैलू इत्यादी विषयांवर मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या परिषदेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या, डॉक्टर मनीषा गुप्ते, कॉम्रेड लता भिसे , रमेश अवस्थी इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत .जिल्ह्यातून परिषदेला चांगला प्रतिसाद मिळत आहे .या परिषदेला अहमदनगर जिल्ह्यातील आणि शहरातील सर्व महिला संघटना तसेच कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन नीलिमा जाधव-बंडेलू कॉम्रेड स्मिता पानसरे ,संध्या मेढे , ॲड .निर्मला चौधरी, सरोज आल्हाट मदिना शेख, ॲड.मीनल देशमुख सत्यभामा थिटमे इत्यादींनी केले आहे.