Women’s day : संगमनेर : अनेक पोलीस अधिकारी आले अन् गेले परंतु महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी प्रसाधन गृहाची समस्या कोणीही गांभीर्याने घेतली नाही. परंतु पितृत्व, दातृत्व भावना असलेल्या शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी महिला दिनाचे (Women’s day) औचित्य साधून तयार केलेल्या महिला विश्रांतीगृह व प्रसाधनगृह (Restroom) असलेला महिला कक्ष महिला पोलिसांसाठी खुला करून, खऱ्या अर्थाने महिला पोलीस (Police) कर्मचाऱ्यांच्या भावना व समस्यांचा विचार करून महिलांचा सन्मान केला.
हे देखील वाचा: “पुन्हा दमदाटी केली तर शरद पवार म्हणतात मला”; पवारांचा आमदार सुनील शेळकेंना इशारा
प्रसाधन गृहाची अवस्था अत्यंत बिकट (Women’s day)
संगमनेर शहरारील तहसील कार्यालयाच्या इमारतीत शहर पोलीस ठाणे आहे. तालुक्यातुन अनेक महिला शासकीय कामानिमित्त तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यात येत असतात. तहसील कार्यालयातील प्रसाधन गृहाची अवस्था अत्यंत बिकट अशी आहे. तेथे घाणीचे साम्राज्य असून सतत पाण्याचा तुटवडा असतो. कामानिमित्त आलेल्या नागरिकांना त्याच्या नैसर्गिक विधीसाठी स्वच्छ प्रसाधन गृह अत्यंत गरजेचे असताना तहसील कार्यालयातील प्रसाधन गृह असून नसल्यासारखे आहे. उलट तेथील दुर्गंधीने तेथे वावरणारे कर्मचारी व कामानिमित्त आलेल्या नागरिकांना नाकातोंडाला रुमाल लावून वावरावे लागते. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दिवसपाळी व रात्रपाळीवर कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रसाधन गृहाचा प्रश्न जटिल बनला होता. त्यांना त्यांचे नैसर्गिक विधी थेट घरी जाऊनच उरकावे लागत असे. त्यामुळे महिला पोलिसांना सुलभ प्रसाधन गृहाअभावी अनेक आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते.
नक्की वाचा: मुख्यमंत्री साैर कृषी वाहिनी याेजनेला वेग; ४० हजार काेटींची गुंतवणूक, २५ हजार राेजगार
प्रश्नाची कोणी गांभीर्याने घेतली दखल (Women’s day)
शहर पोलीस ठाण्यात अनेक पोलीस अधिकारी आले अन बदली होऊन गेलेत परंतु आपल्या स्टाफच्या महिला कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या या महत्वपूर्ण प्रश्नाची कोणी गांभीर्याने दखल घेतली नाही. परंतु पितृत्व व दातृत्वाच्या उपजतच अंगी भावना असलेल्या पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी महिला कर्मचाऱ्यांच्या या समस्येला गांभीर्याने घेऊन प्राधान्य देत शहर पोलीस ठाण्याच्या आवारात महिलांना विश्रांतीसाठी प्रसाधनगृह असलेला स्वतंत्र महिला कक्ष बांधून या कक्षाचे आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला कर्मचाऱ्यांच्या हाती या महिला कक्षाच्या चाव्या सोपवल्या. या कक्षात महिलांसाठी स्वतंत्र प्रसाधन गृहाची तसेच त्यांना काहीवेळ विश्रांतीसाठीची सोय केली आहे. या कक्षाच्या वरती स्वतंत्र अशी पाण्याच्या टाकीची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी शहर पोलीस ठाण्याच्या महिला कर्मचाऱ्यांनी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचे आभार मानत अनेक वर्षांच्या असलेल्या समस्याचे निराकरण झाल्याचा आनंद व्यक्त केला.