women’s day | भारतीय महिलांचे अन्न व उत्पादन संस्कृतीमध्ये महत्वाचे योगदान: डॉ. सौम्या स्वामीनाथन

शेतकरी प्रथम प्रकल्पातील महिला शेतकऱ्यांचा सन्मान

0

women’s day : राहुरी: शेतीमध्ये महिलांची भागिदारी वाढत आहे. महिलांचे घरामध्ये अन्न तयार करण्याबरोबरच शेतामध्ये धान्याचे उत्पादन घेण्यामध्ये महत्वाचे योगदान असल्याचे प्रतिपादन चेन्नई येथील एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनच्या अध्यक्ष तथा नवी दिल्लीच्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या महानिदेशक आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी मुख्य वैज्ञानिक व उपमहानिदेशक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी केले. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष- 2026 वजागतिक महिला दिन- 2026 चे (women’s day) औचित्य साधून महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये जागतिक महिला दिनाचे (women’s day) आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन ऑनलाईन मार्गदर्शन (Online guidance) करतांना डॉ. सौम्या स्वामीनाथन बोलत होत्या.

अवश्य वाचा- मढी येथे नाथभक्तांचा जनसागर;  लाखो भाविकांनी घेतले संजीवन समाधीचे दर्शन

शेतकरी प्रथम प्रकल्पातील महिला शेतकऱ्यांचा सन्मान (women’s day)

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणुन चेन्नई येथील एम.एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनच्या वरिष्ठ फेलो डॉ. आर.व्ही. भवानी उपस्थित होत्या. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्याच्या उपवनसंरक्षक सुवर्णा माने (भारतीय वनसेवा) व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, पुणे तथा कृषि व्यवसाय व्यवस्थापन व स्मार्ट प्रकल्पाच्या तज्ञ सौ. उज्वला बाणखिले उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर सौ. सुरुची खर्चे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, पुणे येथील अटारीचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. शाकीर अली, कृषि तंत्रज्ञानाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजू अमोलिक, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे, नियंत्रक सदाशिव पाटील, उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. बी.टी. पाटील व उपकुलसचिव प्रशासन विजय पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले. यावेळी भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या शेतकरी प्रथम प्रकल्पातील महिला शेतकरी यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये चिंचविहीरे, कणगर, तांभेरे आणि कानडगाव येथील निर्मला गाडे, सविता पवार, पल्लवी गाडे, सविता वरगुडे, संगीता गागरे, अनिता गागरे, ज्योती गागरे, सविता गागरे, वैशाली संकपाळ व शमशादबी पठाण यांचा यामध्ये समावेश होता. यावेळी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यांमधील दहा गावांमध्ये फुले समृद्ध व्हिलेज अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.