Working hours of workers:कामगारांच्या कामाच्या तासांमध्ये वाढ;आता ९ नव्हे तर १२ तासांची ड्युटी

0
Working hours of workers:कामगारांच्या कामाच्या तासांमध्ये वाढ;आता ९ नव्हे तर १२ तासांची ड्युटी
Working hours of workers:कामगारांच्या कामाच्या तासांमध्ये वाढ;आता ९ नव्हे तर १२ तासांची ड्युटी

Working hours of workers : सावधान!कारण आता तुमच्या कामांच्या तासात वाढ (Increase in working hours) होणार आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत(Cabinet Meeting) हा निर्णय (Dicision) घेण्यात आला आहे. यापुढे दुकानामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला दररोज ९ तास तर कारखान्यात काम करणाऱ्या कामगाराला दररोज १२ तास काम करावे लागणार आहे. गुंतवणूक आकर्षित करणे, रोजगार निर्मिती करणे आणि कामगारांच्या हक्कांचे रक्षण करणे हे या निर्णयाचे उद्दिष्ट आहे,असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे जनसामान्यांवर याचा मोठा परिणाम होताना दिसणार आहे.

नक्की वाचा : मराठा आरक्षणासाठीच्या नवीन जीआरनुसार कुणबी प्रमाणपत्र कुणाला मिळणार?

बदल का करण्यात आला ? (Working hours of workers)

केंद्र सरकारने स्थापन केलेल्या कृती दलाने सुचविलेल्या सुधारणेनुसार, कारखाने अधिनियम कायदा १९४८ मध्ये विविध सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. राज्यात गुंतवणूक आकर्षित करणे आणि रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी कामाच्या तासांत हे बदल करण्यात आले आहे. याआधी उत्तर प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा यासारख्या राज्यांनी हे बदल केलेले आहेत. कामाच्या तासात बदल करून ते वाढवण्यात आल्यामुळे आता कामगारांनाही वेतनाच्या दुप्पट दराने मोबदला मिळेल. अतिकालिक कामासाठी कामगारांची लेखी संमती घेणे आवश्यक असेल,अशी कठोर तरतूद सुद्धा त्यात आहे. अतिकालिक कामाचा कालावधी १२५ तासांवरुन १४४ तास करण्यास मान्यता देण्यात आली. कारखान्यातील विश्रांतीसाठी सुट्टीचा कालावधी ५ तासानंतर ३० मिनिटे हाेता, तो आता ६ तासानंतर ३० मिनिटे करण्यात आला आहे. तसेच शासन मान्यतेशिवाय असा वेळेतील बदल कारखान्यांना परस्पर करता येणार नाही.

अवश्य वाचा : ओबीसी समाजासाठी उपसमिती नियुक्त; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

कामगार मंत्री ॲड.फुंडकर यांची माहिती  (Working hours of workers)

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कारखाने अधिनियम, १९४८ मधील काही तरतुदींमध्ये महत्त्वपूर्ण दुरुस्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे कामगार आणि उद्योग क्षेत्रातील नियम सुलभ होऊन पारदर्शकता वाढणार असल्याची माहिती कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिली. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.