World Cup 2023 Final : भारत-ऑस्ट्रेलिया फायनल सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियम झगमगणार

रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणाऱ्या सामन्याआधी एयर शो होणार आहे.

0

नगर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia Final World Cup) यांच्यामध्ये १९ नोव्हेंबरला विश्वचषकाची फायनल होणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stedium) हे दोन संघ भिडणार आहे. आता या फायनल सामन्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. फायनलआधी स्पेशल कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.

नक्की पहा : विश्वचषकाच्या अंतिम सामन्याबाबत सुपरस्टार रजनीकांत यांची भविष्यवाणी  
 
रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणाऱ्या सामन्याआधी एयर शो होणार आहे. भारतीय वायुसेनेची सूर्यकिरण टीम हवाई शो करणार आहे. जवळपास दहा मिनिटांपर्यंत हा एयर शो होणार आहे. त्यामुळे स्टेडियममध्ये असणाऱ्या प्रेक्षकांसाठी ही मेजवानीच असेल. या एअर शोसाठी वायूदलाची जोरदार प्रॅक्टिस सुरु आहे. फायनल सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर वेगवेगळ्या प्रकारची लाईटिंग करण्यात आली आहे. प्रेक्षकांना यामुळे आणखी चांगला अनुभव मिळेल. लाईट्स सोबतच संपूर्ण स्टेडियममध्ये ठिक ठिकाणी स्पीकर्सही लावण्यात आलेत. त्यामुळे गाण्यांसोबतच अँकरिंग देखील चाहत्यांना ऐकता येणार आहे.

हेही पहा:  विठ्ठलाच्या पंढरीत झिका व्हायरसचा शिरकाव

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडिया सध्या जोमात आहे.भारतीय संघासमोर आता पॅट कमिन्सच्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान असणार आहे. भारतीय संघाने लागोपाठ दहा सामन्यात विजय मिळवला आहे  तर ऑस्ट्रेलियाने लागोपाठ आठ सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे विश्वचषकाचा मानकरी ही भारतचं व्हावा अशी क्रिकेटप्रेमींची अपेक्षा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महामुकाबला पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय भारताचा माजी कर्णधार, एमएस धोनीही अहमदाबादमध्ये येण्याची शक्यता आहे. एमएस धोनीसह अनेक दिग्गज खेळाडूही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्याशिवाय राजकीय नेतेही उपस्थिती लावण्याची शक्यता आहे.