World Press Day : नगर शहरातील वृत्तपत्र परंपरेचा मागोवा

World Press Day : नगर शहरातील वृत्तपत्र परंपरेचा मागोवा

0
World Press Day : नगर शहरातील वृत्तपत्र परंपरेचा मागोवा
World Press Day : नगर शहरातील वृत्तपत्र परंपरेचा मागोवा

World Press Day : नगर : आज जागतिक वृत्तपत्र दिन (World Press Day) साजरा करत असताना या शहरातील वृत्तपत्र (Newspaper from Nagar city) परंपरेचा मागोवा घेणे व अभ्यास करणे अपरिहार्य ठरते. नगर शहराला ज्याप्रमाणे साहित्यिक व संत परंपरा लाभली आहे. तद्वतच या शहराची वृत्तपत्र (Newspaper) परंपराही उज्वल व कौतुकास्पद आहे. वृत्तपत्रेही समाजाचे सामाजिक, राजकीय, वैचारिक, शैक्षणिक इ . गोष्टींचे व्यासपीठ असते याचा प्रत्यय या शहरातील वृत्तपत्र परंपरेचा अभ्यास केल्यावर येतो.

अवश्य वाचा: अहिल्यानगर महापालिकेत युतीचाच महापौर : रवींद्र चव्हाण; युतीच्या प्रचाराला प्रारंभ

‘ज्ञानोदय’ हेच जिल्ह्यातील पहिले वृत्तपत्र (World Press Day)

१) ज्ञानोदय – २८ मे १४९० या दिवशी स्थापन झालेल्या या शहरात वृत्तपत्राचा जन्म जून १८४२ मध्ये झाला . ख्रिस्ती मिशनऱ्यांनी नगरमध्ये प्रसिद्ध केलेले ‘ज्ञानोदय’ हेच जिल्ह्यातील पहिले वृत्तपत्र , शिलाछापावर मद्रीत होणाऱ्या या वृत्तपत्राचे संपादक म्हणून थोर साहित्यिक रे. नारायण वामन टिळक यांनी बरेच वर्षे काम पाहिले. सुरुवातीस मासिक म्हणून प्रसिद्ध होणारे हे वृत्तपत्र पुढे साप्ताहिक म्हणून सुरू झाले.


२) वृत्तवैभव – १८६१ मध्ये पुरोगामी विचारांचे वृत्तपत्र सुरू झाले . कोणत्याही वृत्तपत्राचा संपादक कसा बाणेदार, कणखर वृत्तीचा असावा हे सांगणारा श्लोक ‘वृत्तवैभव’ वर असे. हा श्लोक येणेप्रमाणे बाणा सोडू नको, भिडा धरू नको, लालूच पाडू नको ।। हांजी हांजी नको खऱ्या भिऊ नको, मर्मास भेटू नको ।। स्वार्थाजन पक्षपात धरूनी कोणास गांजू नको ।। तेणे एडिटरा तुला सुयश बालाघू नि लागे टिको ॥१ ॥ वृत्तवैभव ही शिलाछापावर मुद्रित केली जात असे.


३) न्यायसिंधू – १८६६ साली मवाळ प्रवृत्तीचे ‘ न्यायसिंधू ‘ अस्तित्वात आले . या वृत्तपत्रामध्ये न्यायनिवाड्यांची माहिती व स्थानिक राजकीय , सामाजिक , शैक्षणिक लेख देण्यात येत असे . दाजीसाहेब कुकडे हे या वृत्तपत्राचे मालक , मुद्रक व संपादक होते . १८ ९ ० ते ९९ पर्यंत दादासाहेब धनेश्वर यामध्ये संपादकीय लिहित असत . इ.स. १ ९ ०० पर्यंत हे पत्र प्रसिद्ध होत होते . नंतर मात्र ते बंद पडले . आज हे वृत्तपत्र जेथे छापले जात होते ते ‘ न्यायसिंधू मुद्रणालय ‘ भक्कम पाय रोवून उभे आहे.

World Press Day : नगर शहरातील वृत्तपत्र परंपरेचा मागोवा
World Press Day : नगर शहरातील वृत्तपत्र परंपरेचा मागोवा

नक्की वाचा : निवडणुकीत ‘बिनविरोध’च्या तक्रारीत तथ्य आढळल्यास काय होणार ?


४) जगदादर्श – न्यायसिंधूंच्या काळातील ‘ जगदादर्श ‘ हे वृत्तपत्र ‘ जगाचे गुणावगुणदर्शनी प्रवीण असो ‘ हे वाक्य घेऊन आले . न्यायसिंधूचा खरा प्रतिस्पर्धी असलेले हे वृत्तपत्रामधील वृत्तावर टिकेची झोड उठवीत असे . न्यायसिंधू ‘ ही ‘ जगदादर्श ‘ वर खरमरीत टिका करीत असे.


५) मुत्सद्दी – १८७७ मध्ये मासिक न्यायप्रकाश ‘ उदयास आले व काही काळातच अस्तास गेले . त्याच काळात साप्ताहिक ‘ मुत्सद्दी ‘ निघू लागले. यामध्ये ‘ इंडिया ‘ या साप्ताहिकातील लेखांची भाषांतरे या साप्ताहिकात प्रसिद्ध होत . पुढे आर्थिक तोटा आल्याने हे वृत्तपत्र ही बंद पडले.


६) विचारसाधना – न्या . रानडेंच्या आशीर्वादाने व प्रेरणेने १८९५ च्या आसपास ‘विचार साधना’ नावाचे सुरू झालेले साप्ताहिक अल्पावधीत बंद पडले.


७) सुदर्शन – १९०१ मध्ये बळवंतराव हिवरगावकर संपादक असलेले ‘ सुदर्शन ‘ प्रसिद्धीस आले . यामध्ये दादासाहेब धनेश्वरांनी लेखन केले . सुदर्शन छापखाना वृत्तपत्र बंद होऊन कित्येक वर्षे लोटली असली तरी आजतागायत कार्यरत आहे.


८) शेतकरी – १९१० च्या प्रतीपदेच्या दिवशी बादशहाच्या राज्यारोहणप्रसंगी रावबहादूर चितळे यांनी ‘ शेतकरी ‘ नावाचे वृत्तपत्र सुरू केले. शेतकऱ्याच्या गरजा, त्यांची दुःखे व ते निवारण्याचे उपाय मुख्यत्वेकरून याची जमेची बाजू होती. १९१४-१५ च्या महायुद्धाच्या काळात महागाईमुळे हे वृत्तपत्र बंद पडले.


९) नागरिक – महायुद्धानंतर जवळजवळ दहा वर्षे नगरमधील वृत्तपत्र व्यवसायात खंड पडला होता .१९२३ मध्ये दादासाहेब धनेश्वर , अण्णासाहेब राजहंस , हरिभाऊ पारखे , सरदार नानासाहेब मिरीकर या प्रभुतींनी एकत्र येवून ‘ नागरिक ‘ नावाचे वृत्तपत्र सुरू केले , परंतु तेही अल्पायुषी ठरले , १९२७ साली राष्ट्रीय पक्षाने सुरू केलेले साप्ताहिक ‘ देशबंधू ‘ ‘ १९३० च्या चळवळीत बंद झाले . माणकचंद मुथा व भाऊसाहेब फिरोदिया हे या वृत्तपत्राचे काम पाहात असत.


१०) संघशक्ती – १९३६ मध्ये जिल्हा काँग्रेस पक्षाने सुरू केले , ‘ संघशक्ती ‘ हे जिल्हा वृत्तपत्र आजतागायत सुरू आहे . सुरुवातीच्या काळात रावसाहेब पटवर्धन व भाऊसाहेब फिरोदिया हे संपादक म्हणून कार्यरत होते.


११) दिनमित्र- तरवडी ता. नेवासा येथून मुकुंदराव पाटील ‘दीनमित्र’ नावाचे सडेतोड लेख असलेले वृत्तपत्र काढत. म. फुले, राजश्री श्रीमहाराजांचे विचार सडेतोड पणे मांडण्याचे, दिन दलितांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम या वृत्तपत्राने केले. दिनमित्रची प्रेस अहिल्यानगरच्या वस्तू संग्रहालयात आहे. स्वातंत्र्य संग्रामात राष्ट्रीय प्रवृत्तीचा प्रचार करण्यात या वृत्तपत्राचा सिंहाचा वाटा होता. द. रं. निसळ संपादक असलेल्या या वृत्तपत्राने स्वातंत्र्योत्तर काळात सरकारी विकास योजनांची माहिती, पंचवार्षिक योजनांची माहिती व इतर सरकारी माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवली. अनेक वर्षे जनसेवा केल्यानंतर हे वृत्तपत्र बंद पडले.


1२) इतर वृत्तपत्रे – या वृत्तपत्राशिवाय गो.स. काणे यांचे ‘ज्वाला’ भाई संस्थाचे ‘इन्कलाब’ , रामनिसळ यांचे ‘युगांतर’ , दूधाटे यांचे ‘जनसेवा’, दीपोळकरांचे ‘सर्वोदय सेवक’ दै. नगर समाचार, सायंकाळ, खेडूत, ग्रामराज्य इ. अनेक अल्पायुषी वृत्तपत्रे या शहरात उदयास आली.


१३) आजची वृत्तपत्रे – शहरीकरण होत असताना आझाद हिंद समाचार , नगर टाइम्स , नवा मराठा, लोकयुग, सा . संघशक्ती, गीतांजली, सा. सिटी टाइम्स इ.

डॉ. संतोष यादव
अहिल्यानगर ऐतिहासिक वस्तू संग्रहालय व संशोधन केंद्र